या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. २६७ प्राबल्य होते असे दिसते. दक्षिणेत मुसलमानांची स्वारी शके १२१६ मध्ये झाली. ह्यावरून नामदेव १२०० शकांत असणार नाही. (क) नामदेव व ज्ञानदेव तीर्थयात्रा करित असतां बेदरास गेले. तेव्हां तेथील बादशहाने नामदेवापुढे गाय मारली, व हीस उठविशील तर तूं साधू खरा, नाहीतर तुला मुसलमान करीन अशी धमकी दिली. त्या वेळेस नामदेवांनी गाय जिवंत केली. ह्यावरून नामदेवाचा काल ब्राह्मणी राज्याची राजधानी बेदर झाल्यानंतर झणजे इ. स, १३८७-१४५० च्या सुमारास असला पाहिजे. (ड) नामदेव तीर्थयात्रा कर. तांना पैठणास जाऊन एकनाथाच्या पणजास भेटले होते. एकनाथ १५०० शकति होता. तेव्हां दीड पिढीत ३०० वर्षांचे अंतर शक्य दिसत नाही. (ई) रामानंदाचा काल शके १२२२।१३२२ इतिहासकार मानतात; कबीर रामानंदाचा शिष्य; त्याचा काल १३०२-१३४२-कबिराची व नामदेवाची गांठ काशांत पडली. ह्यावरून नामदेवाचा जन्म शके ११९२ हा चुकीचा असला पाहिजे. (फ) नानक नामदेवास कुमारतीर्थी भेटला, नानक १३९१ शकांत जन्मला. तेव्हा हेही कालमान मूळचा शक धरला तर शक्य दिसत नाही. ह्याकरितां नामदेवाचा जन्म शके १३०९ केला झणजे सर्व काही जुळते. हे 'भारद्वाजांचें झणणे. आतां हे आक्षेप कितपत खरे आहेत ह्याचा विचार करूं. प्रथमत: आपल्या जुन्या लेखांचा विचार करतांना बऱ्याच गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. आतांच्या कालची व त्या कालची स्थिति ह्यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे. आतांप्रमाणे त्या वेळी छापखाने नव्हते; लेखक होते ते फक्त अक्षरपटु असत; त्यांच्या आंगी इतर ज्ञान नसे; शुद्धाशुद्धतेची फारशी चिकित्सा नसे, व नियमही ठरलेले नसत. आतां अशुद्धे काढण्याला अनेकवार रस्ते असतात. पुन्हा पुन्हा नजर टाकण्याला प्रूफकरेक्टर्स असतात. तशी साधनें पूर्वी काहीच नव्हती. वेदांतपर व भक्तिपर ग्रंथ लिहिणारे सर्व लोक भाविक. त्यांस छक्केपंजे माहित नव्हते. त्यांस ईश्वरी प्रेरणेनें जशी स्फूर्ति होई तसे ते कागदावर नमूद करीत. ते सद्गुणांचा गौरव करीत. जाणून बुजून असत्य लिहिण्याचे त्यांस कधीं माहित नव्हते. त्या वेळेस आतांसारख्या डायऱ्या नव्हत्या, तवारिखा नव्हत्या, की शिस्तवार इतिहास नव्हते. राजांच्या कारकीर्दीची वर्षे आतांप्रमाणे शाळेतील मुलांनी तोंडपाठ करण्याचा प्रघात नव्हता, त्यामुळे यथातथ्य कालसाने समजण्याला विशेष साधन नव्हते. त्यांनी ३३