या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. २६९ हा मेळ्याचा थाट पाहून तेथील (हस्तनापुरांतील ) यवनाधिपास राग आला; व त्याने नामदेवापुढें गाय मारून ती जिवंत करावयास सांगितले, व ती त्याने केली. इत्यादि कथाभाग ह्याच दहाव्या अध्यायांत पुढे वर्णिला आहे. आता ह्यांत हस्तनापूर वगैरे चुकीने पडलें असेल अशी शंका असल्यास पुढच्याच अध्यायाच्या प्रारंभी ह्या संतमंडळाचा मुक्काम काशीस झाल्याचे स्पष्ट आहे. खालची ओवी पहा: करूनि भागीरथीचे स्नान । घेतले विश्वेश्वराचे दर्शन ॥ इतुकेनि कृतार्थ होऊन । परम उल्हास मानसीं ॥ १४ ॥ ह्यावरून गायीची गोष्ट हस्तनापुरची होय, बेदरची नव्हे हे स्पष्ट आहे, ह्याकरितां ब्राह्मणी राज्याची राजधानी बेदर होईपर्यंत आणखी शंभर वर्षे नामदेवासही गर्भात कुचमत ठेवण्याची काही गरज नाही. दिल्लीच्या पादशाहान ज्या अर्थी नामदेवालाच प्रत्यक्ष छळले, त्या अर्थी त्याने आपल्या कवितेत यवनांचे प्राबल्यवर्णन केलें हेही उक्तच आहे. (ड) नामदेव तीर्थयात्रेमध्ये पैठणास जाऊन एकनाथाच्या पणजास भेटले. तेव्हां दीड पिढीत तीनशे वर्षांचे अंतर संभवत नाही असें 'भारद्वाजांचें झणणे. पणजापासून पणतवापर्यंत दीड पिढी कशी काय होती, हे गणित आधी आह्मांस सुटत नाही. तरी त्या वेळेच्या आयुर्मयादेच्या मानाने पणजा ७५ आजा ७५ बाप ७५ व मुलगा ७५ मिळून तीनशे वर्षे पिढी चालावयास कोणताच प्रत्यवाय दिसत नाही; व ह्यांत कोणी अल्पायुषी असल्यास अधिकउणे प्रमाण करण्यासही कांहीं बाध नाही. कारण, हल्लीच्या काळांत सुद्धा पाउणशे वर्षे चालणाऱ्या पुष्कळ पिढ्या दृष्टीस पडतात, मग त्या कालची पिढी सरासरीने तितकी धरावयास किमपीहि शंका घेण्याचे कारण नाही. ह्या पुढील मुद्दे हणजे नामदेवाची व कबीर नानक यांची भेट झालेली हे होत. कबीर व नानक यांचा काल तेरावें शतक असें इतिहासकार मानतात असें 'भार. द्वाजां'चे झणणे. इतिहासकार मानतात, व संतमंडळी नामदेवाचे जन्म ११९२ त झाल्याचे व कबिरादिकांची भेट झाल्याचे लिहून ठेवतात. तेव्हां ह्यामध्ये अधिक मान कोणाला द्यावा, ह्याचा निर्णय तिन्हाइतांनीच करावा. इतिहासकार हाणजे काही आकाशांतून उतरलेले नव्हत. तेही अनुमानावरूनच निश्चय करतात. 'भारतवर्षा 'दि मासिक पुस्तकांतून जुने अस्सल कागदपत्र