या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. प्रसिद्ध होऊ लागल्यापासून मस्तानीच्या कुलाबद्दल वगैरे आजपर्यंतच्या इतिहासकारांची कशी काय त्रेधा उडाली ती आज आपल्या डोळ्यांपुढेच आहे. - ह्या सर्व गोष्टींचा विचार केला झणजे नामदेवाचा जन्मशक शंभर वर्षांनी पुढे ढकलून ढवळाढवळ करण्याची तादृश आवश्यकता नाही, येवढेच नव्हे, तर तशाने उलट खुळेपणा मात्र पदरीं येईल. येथपर्यंत 'भारद्वाजां'च्या एका मुद्याचे निरसन झाले. आतां नामदेव व ज्ञानेश्वर समकालीन होते ह्याला प्रत्यक्षच पुरावा पाहिजे असेल, तर तोही न मिळेल असें नाही. नामदेवाची दासी जनी असून ती नामदेवाच्या समकालीन होती, हे तर 'भारद्वाजां'ना कबूल केलेच पाहिजे. एके दिवशीं विछलास पंक्तीस घेतल्यावांचून आपण जेवणार नाही, असा नामदेवांनी हट्ट घतला. तेव्हां जनाबाई देवास बोलवावयास गेली. त्या वेळी देव ज्ञानेश्वरापाशी बसल होते. तो प्रसंग जनाबाईने असा वर्णन केलेला आहे:माझा हा विठोबा येईल वो जेव्हां । जेवीन मी तेव्हां गोणाबाई ॥ त्वरे राउळासी जाउनीयां पाहे । लवकर बाहे भोजनासी ॥२॥ ज्ञानेश्वराघरी जाउनि बैसला। जाउनि विठ्ठला पाहे तेथे ॥ ३ ॥ भरलिया रागें क्रोध त्याचा साहे। लोकरीच बाहे भोजनासी ॥४॥ जनी ह्मणे देवा चला पुरुषोत्तमा । खोळंबला नामा भोजनासी॥५॥ ज्ञानेश्वर ह्मणे नाम्यासवें जेविलासी । नाहीं हृषिकेशी ह्मणतसे ॥१॥ सांगितले एक भलतेचि बोलसी। ऐशी भ्रांति कैशी ज्ञानेश्वरा ॥२॥ निरोप सांगावा माझा हा एकांती । ह्मणे जनीप्रति पांडूरंग ॥ ३॥ देव ह्मणे नाम्या हे तूं आयकावें । त्वां यावे साधून वेळ पुर्ती ॥४॥ जनी ह्मणे आतां समजले मज । धरीन ऊमज येथूनियां ॥ ५॥ नामदेव ज्ञानेश्वर समकालीन होते. ह्याबद्दल खुद्द जनाबाईपेक्षा अधिक महत्त्वाची व विश्वसनीय साक्ष ती कोणाची? ह्या अभंगांत जनाबाईने ज्ञानेश्वर ९ सय हटलल नाही हीही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. आतां 'भारद्वाज' कदाचित् अशी शंका घेतील की जनी ही काय बोलून चालून शेणी थापणारी बटिक ! तिचे ज्ञान ते कितीसें ? तिने आमच्या 'ग्यानबा' लाच ज्ञानेश्वर झटले नसेल ह्मणून कशावरून? ह्याच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ह्याला प्रमाण काय ? ह्याकरितां तशा स्पष्ट उल्लेखाचा जनाबाईच्याच