या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. तोडचा अस्सल अभंग आह्मी 'भारद्वाजां'च्या पदरांत टाकतों, त्याचाही त्यांनी स्वीकार करावा. तो अभंग हाः गीतेवरी टीका । जेणे वाढविली देखा ॥ १॥ कनकताटामाजी । जेणे ओगरिली कांजी ॥२॥ ज्ञानेश्वरावांचुनी । टीका नव्हे ह्मणे जनी ॥ ३॥ ह्या साक्षींत जनाबाईने असे चोख व बिनतोड शब्द वापरले आहेत की, 'भारद्वाजांनी पुन्हा तोंडच उघडूं नये. ही गीतेवरची टीका झणजे आमच्या नव्या 'ग्यानबां'नी केलेली पांच पंचवीस ओव्यांची पोथी! अशी 'भारद्वाज' ज्ञानेश्वरीचा बोध केला. 'कनकताटामाजी' अशी सर्व श्रेष्ठ उपमा देऊन प्रसिद्ध 'ज्ञानेश्वरी' टीकेचीच महती पुढे ठेविली. 'ज्ञानेश्वरावांचुनी टीका नव्हे' ह्या वाक्याने भारद्वाजां' सारख्यांच्या पोकळ पांडित्याचे नि. शंक निराकरण केले. भारद्वाजांच्या भ्रमाला जनाबाईच्या साक्षीइतकं झणझणीत भंजन अन्य कचितच मिळेल! ह्यावरून ज्ञानेश्वर नामदेवाच्या समकालीन असून त्यांनी ज्ञानेश्वरी केली ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली, व ती 'भारद्वाजा'नाही निमूटपणे कबूल करणे भाग आहे. आता ह्या अभंगाचा पुरावा 'भारद्वाजां'च्या पुढील मुद्यावर विशेष लागू पडण्यासारखा होता. परंतु विषयानुरोधाने हे पुरावे एकमेकांत मिश्र होऊन आगेमागे रहातील तरी ते वाचकांनी स्मरणांत ठेवण्याची कृपा करावी येवढी प्रार्थना करून भारद्वाजांच्या पुढील मुद्याकडे वळतो. 'भारद्वाजां'चा दुसरा मुद्दा 'ज्ञानेश्वरीचा कर्ता आळंदीचा ज्ञानदेव नव्हे' हा आहे. ह्यास त्यांच्या मतानें खाली दिलेले पुरावे आहेत. आतां हे पुरावे ओळीने देऊन मग त्यावर उत्तरे देत बसण्यापेक्षा त्यांचा प्र. त्येक पुरावा कोटेशन'मध्ये दाखल करून लगेच त्याच्या खालींच त्यावर उत्तर देणे सोयीचे होईल असे वाटल्यावरून यापुढे तसाच क्रम धरतों:." ज्ञानेश्वरीवरून ज्ञानेश्वर शके १२१२ साली होता हे निर्विवाद हा ज्ञानदेव कोणता?" .. ज्ञानदेव हे मूळचें नांव असून त्यांच्या योग्यतेवरून त्यांसच लोक पूज्य बुद्धीने 'ज्ञानेश्वर ज्ञानराज ' इत्यादि ह्मणूं लागले, नामदेव व ज्ञानेश्वर समकालीन