या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. असून बरोबर यात्रा केल्याचा स्पष्ट उल्लेख मागच्या मुद्यांत केला असल्यामुळे, भारद्वाजां'च्या ह्या शंकेचे समाधान करण्याचे काही कारण उरलें नाहींच, तथापि ह्यांत एक मौज ध्यानात ठेवण्यासारखी आहे. ती ही की 'ज्ञानेश्वरीवरून ज्ञानेश्वर शके १२१२ मध्ये होते' हे 'भारद्वाज' निर्विवाद समजतात. ज्ञानेश्वरीमध्ये कालनिर्णयाची फक्त एक शेवटचीच ओवी आहे ती ही: "शके बाराशे बारोत्तरें । तें टीका केली ज्ञानेश्वरें । सच्चिदानंद बाबा आदरें । लेखकु झाला ॥" ह्या एका ओवीशिवाय अन्यत्र ज्ञानेश्वरीत कोठेच कालाचा उल्लेख नाही. व ही ओवी तर मूळ ज्ञानेश्वरीतील नव्हे, ती पदरची रचून एकनाथांनी केवळ लबाडीने ज्ञानेश्वरीत घुसडून दिली, असें 'भारद्वाज' ठाम सांगतात. मग अशा 'गफलती' मनुष्याने लिहून ठेवलेला काल तरी विश्वसनीय कशावरून ? ज्ञा. नेश्वरी तीनशे वर्षे कोणास माहित नव्हती. एकनाथासही जन्मापासून बऱ्याच कालपर्यंत तिची ओळख नव्हती. पुढे एका तेल्याने तिची एक फाटकी तुटकी पोथी आणून त्यांच्या हवाली केली. तेव्हां ज्ञानेश्वरीस तीनशे वर्षे होऊन गेली होती. इतक्या कालानंतर एकनाथाने ती कोणी लिहिली ह्याचा शोध लावला, येवढेच नव्हे, तर ज्ञानदेव कोणता ह्याचा छडा लावून पहिल्यास 'ज्ञानेश्वर' ही कितापत त्यानेच दिली. त्याने ज्ञानेश्वरी कोणत्या शतकांत लि. हिली ह्याचाच पत्ता पाडला असें नाही, तर ती कोणत्या वर्षी लिहिली, व तिचा लेख लिहिणारा लेखक कोण त्याचा सुद्धां पत्ता पाडून त्याची नवी ओवी करून ती ज्ञानेश्वरीत बेमालुम बसवून दिली ! येवढ्यावरून एकनाथ किती पक्का वस्ताद होता हे आमच्या वाचकांस सहज दिसून येईल, आणि हे त्याचे इतकें कसब बाहेर काढणार कोण ? तर आमचे भारद्वाज'! आणि हाच चोरीचा माल आपल्या इमारतीच्या पायांत चिणून भारद्वाज' त्यावर टोलेजंग इमारत उठवू पहातात, हा किती चमत्कार ! आपल्याला प्रतिकूळ असलेल्या बाबतींत त्या मनुष्याला कसें नीच ठरवावयाचे, व अनकलतेसाठी त्यास घोड्यावर कसें घालावयाचे ही विद्या भारद्वाजा 'दिकांपासून कशी अगदी शिकून घ्यावी ! ह्या ओवीचा ऊहापोह विस्तृत रीतीने पढ़े होणारा असल्यामुळे, तूर्त हा विषय येथेच सोडून देतो. पुढे 'भारद्वाज' ह्मणतात: " नामदेवाच्या जन्माची १०० वर्षांनी पिच्छेहट केली: चांगदेवास १४०० वर्षे आयुष्य आलें: कबिरास योगसाधन नसतां तो