या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. ३०० वर्षे वांचला; ज्ञानेश्वरीचा कर्ता आपेगांवचा ज्ञानेश्वर हाडाचा शैव असतां तो विठोबाचा वारकरी बनला ! हे सारे इतिहासाचें अज्ञान !" नामदेवाच्या जन्माची पिच्छेहट मुळीच कोणी केलेली नाही, हे वर सिद्ध करण्यांत आलेच आहे. 'भारद्वाजां'नी मात्र एक शतक पुढे मजल मारण्याचा रिकामा उपद्याप केला. चांगदेवास १४०० वर्षे आयुष्य असल्याचा ज्यास योगाभ्यासाची माहिती नाही, त्याच्यावर ज्याची श्रद्धा नाही, अशा पांखाड्याला मात्र चमत्कार ! श्रीमद्विवेकानंदासारख्या शोधक माहात्म्यास त्या सर्व गोष्टी खऱ्याच आहेत. १०४ वर्षे जगणारा आमच्या इतिहासांतील आलीकडचा पुरुष खरा; पाश्चात्य देशांतील २५०।२५० वर्षांचे लोक आज हयात असलेले खरे मानावयाचे, व योगाधिका-यांना तुच्छ मानावयाचे याचेच नांव भक्तिशून्यता. श्रीमत् रामकृष्णानंदस्वामी योगा 'वरील व्याख्यानांत 'प्रत्येक मनुष्य थोड्याबहुत अंशाने योगी हा असतोच' असें जर सांगतात, व खऱ्या इतिहासांतही बापाचे आयुष्य मुलास देतां येते, तर दोनदोनशे, तीनतीनशे वर्षांच्या आयुर्मर्यादा खोट्या कां ह्मणाव्यात ? आणि कबीरासारखा महान् भगवद्भक्त योगी नव्हता असें तरी कशावरून मानावें? ज्या विषयांत आपली गति नाही, त्या विषयावर पांडित्य करीत बसणे हे 'भारद्वाजां 'सच शोभते. हे भाविक लोकांच्या इतिहासाचे अज्ञान नव्हे, तर सुधारकांचे धर्मविपयक अज्ञान होय. (पु० चा०) ओवाळणी. श्लोक, प्रिय भगिनी, भाऊबीज उद्यां तुझी प्रमुख हा दीपावळीचा दिन आनंदोत्सवपर्व बंधु-भगिनी ह्यांना सुखाचा सण; माझी त्या समयीं कदाचित तुला होईल वाटे स्मृती सध्यां भेट अशक्य; पूर्ण करुनी घे प्रेमरूपेंच ती.