या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ऐशा या समयीं वसा निज गृहीं आणोनिया आदरें कोणी दे करुनी सुवर्णनग, त्या, वा द्रव्य, वा अंबरें, सेवाया सहवाससौख्य अथवा ठेवून घेती घरी, या रीतीं करिती हंसून रमुनी ते पर्वणी साजरी. मी तो बंधु तुझा अकिंचन सये तैशांत दूरस्थही; शुद्ध प्रेमचि ज्यास एक सगळी लोकांत संपत्तिही; कैचे त्याजवळी तुला नग, धनें, वस्त्रेहि द्याया तरी! कैसी त्याजकडून सांग तव ती व्हावी मनीषा पुरी!३. द्रव्याचे परि काय होय अधिक प्रेमाहुनी मोल तें ? आनंदें जग आज हे सकल ज्या एकामुळे डोलतें. ते माझ्याजवळी असे विपुल, घे हैं पाठवीतों तुला दृष्टीला जरि तें न गोचर तरी हो प्रीतिच्या हेतुला. प्रेमाच्याच ह्मणून पांच पुतळ्या ह्या मी करें ओतुनी प्रेमाशीर्वचनें चिरस्थिर तशी त्यांच्यावरी खोदुनी प्रेमाचा गुण, त्यांत ओंवुन तया, माळ खये गुंफुनी प्रेमाची तुज धाडितों करुनि घे ही गोड ओवाळणी.. ठेवो तुला ईश सुखी सदैव येवो पतीचे सुफलास दैव सौभाग्य नांदो सदनीं अखंड प्रेमांत येवो न कधींहि खंड. तुझें निरंतर कल्याण इच्छिणारा, ता. १४-११-९८. नारायण. १. ही ओवाळणी भाउबीजेच्या आदल्या दिवशी कवीने आपल्या बहिणीस पत्र रूपाने पाठविली होती. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.