या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९९. २६९ संरक्षण करावे, असा पूर्वापार चालत आलेला ओघ आहे. ह्मणून अधर्म हा धर्माचा हास करूं लागतो तेव्हां, मी जन्मरहितपणा एका बाजूस ठेवतों; निराकारपणा मनांत आणित नाही. तशा प्रसंगी भक्तांच्या कैवारासाठी अवतार घेऊन-ह्मणजे देह धारण करून-येतो, व अज्ञानांधकार सारा गिळून टाकतों. अधर्माची आयुर्मर्यादा खुंटवितों; दोषांचे लेखपट फाडून टाकतों आणि सज्जनांकडून सुखाचा ध्वज उभारतो. दैत्यांचा कुलक्षय करतों; साधंचा मान राखतों धर्माचे आणि नीतीचे लग्न लावून देतो. मी अविवेकाची काळजी काढून, विवेकदीप प्रज्वलित करतो, तेव्हां योग्यांना निरंतरची दिवाळीच होऊन जाते. आणि आत्मसुखानें विश्व भरते; जगामध्ये धर्माचा प्रसार होतो; आणि भक्तजनांच्या सात्विकतेची दोंदें वाढतात. अर्जुना! माझी मूर्ति जेव्हां प्रगट होते, तेव्हां पातकांचा पर्वत फुटतो, आणि पुण्याचा उदय होतो. अशा कार्यासाठीच मी युगायुगी अवतार धारण करतो, हे ज्यास कळतें तो विवेकी." श्रीज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेतील भगवंताच्या वर वर्णन केलेल्या उक्तीप्रमाणे युगायुगामध्ये 'धर्मसंस्थापक' उत्पन्न होणे, ही गोष्ट सृष्टिक्रमांतीलच आहे. अशा पुरुषाच्या आंगी केवळ अद्वितीय गुण | असावे लागतात. आणि तसे ते असतात, ह्मणूनच त्याची गणना ईश्वरी अवतारांत होते. जगावर परोपकार करणारे पुरुष व उदार मेंहात्मे अनेक असतात. तेही ईश्वराचेच अंश होत; त्याही ईश्वराच्याच विभूति ह्यांत संशय नाही. तथापि धर्मसंस्थापकाची बरोबरी त्यांच्याने होणार नाही. समजा, की एखाद्याने एका क्षुधितास भोजन घातलें; तर त्याची-फार तर पांच किंवा सहा तासांची क्षुधेची पीडा दूर होईल. पण तितका काल गेला, की पुन्हा भूक लागावयाची ती लागणारच. किंवा एकाद्या श्रीमंत गृहस्थाने एका दरिन्द्यास शंभर किंवा दोनशे रुपये दिले, तर तो आपल्या मुलाबाळांचा फार तर चार महिने उदरनिर्वाह