या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. चालवील. पण तें द्रव्य संपले की, फिरून त्याची दैना व अडचण कायमची कायमच. परंतु आपल्या सर्व आर्ति लयास घालवून अक्षयीं ब्रह्मानंदांत पोहत ठेवणारा, अपार भवसागरास अगस्ति ऋषीप्रमाणे कोरडा ठणठणीत पाडून ईश्वरभक्तीच्या शीतल उद्यानांत, क्रीडास्थान करून देणारा, शांततेच्या निर्मल सरोवरांतील जलमंदिरांत व आनंदमकरंदाच्या परिमलांत शय्यास्थान करून निर्भय सिंहासनावरील धैयरूप गादीवर बसविणारा बलशाली असा केवळ एक धर्मसंस्थापकच होय. त्याच्या पराक्रमाच्या तोडीला, पृथ्वीवरील महान् महान् रणपटु वाराचा हा पराक्रम लागावयाचा नाही. कारण जन्मोजन्मी तपश्चर्यारूप तरूची अतितर कष्टाने जोपासना करून, त्याची मधुर फलें, ह्या मन्वंतरातील लोकांस यथेच्छ खावयास देणे, आपल्या अप्रतिम बुद्धिमत्तेने अल्प कालावधींत विद्यादेवीला वश करून घेऊन तिला ताब्यांत आणणे, सर्वशास्त्रांत पारंगत होऊन त्यांतील सारभूत अंश ग्रहण करणे, नवे सिद्धांत बांधून ते निश्शंक रीतीने लोकांच्या मनांत बिबवून त्यास आश्चयेचकित करून सोडणे, अविद्येच्या संस्काराने मनुष्यमात्राच्या स्वभावांत वतनदार होऊन बसणाऱ्या एकदेशीय समजुती दूर - देणे, 'वसुधैव कुटुंबकम्' ह्या तत्त्वाची अंतःकरणांत अढळ स्थापना होईल इतके मन प्रगल्भ करणे. केवळ परोपकारार्थ, निरपेक्षबुद्धान 'करतलभिक्षा तरुतलवास' पतकरून आनंदाने विश्वस्वरूप परमार त्म्याची-लोकसेवारूप साहित्यानें-पूजा करणे, इंद्रियांच्या सर्व सुखावर पाणी सोडून, कडू औषध गोड करून घेतल्याप्रमाणे-वैराग्यवृत्तींत संतोष मानून राहणे, शांतवृत्तीने जगाचे दुःसह आघात सोसणे, हे कम किती दुर्घट आहे ? असें कडकडीत व्रत ते आजन्म पाळतात-अर्थात् काया, वाचा व मन ही त्यांनी केवळ परोपकारार्थच वाहिलेली असतात. ह्मणूनच त्यांचे लोक देव्हारे करतात. व ईश्वरासारखे त्यांस पूज्य मानतात. 'घणाचे घाव सोसल्यावांचून देवकळा येत नाही ही ह्मण अक्षरशः खरी आहे. तुकारामांनीही झटले आहेच की 'चणे खावे लोखंडाचे । मग ब्रह्मपदीं नाचे' त्यांतील अभिप्रायही तोच. आमचे श्रीमजगद्गुरु शंकराचार्यांनी केवळ बत्तीस वर्षांत दिग्विजय करून शारदापीठ सर केले. त्यांस हजारों वर्षे होऊन गेली, तरी अद्याप आसेतुहिमा