या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९९. २७१ चल त्यांची आज्ञा लोक शिरसावंद्य करीत आहेत. गौतमबुद्ध केवळ एका राजाचा मुलगा; पण त्याची आजमितीला अर्धे जग पूजा करीत आहे! हा प्रभाव कशाचा? केवळ त्यांच्या अद्वितीयत्वाचा ! अशाच प्रकारचे लोकोत्तर पुरुष, आमच्या सुदैवाने आमच्या देशांत अवतीर्ण झाले आहेत. आणि नुकताच सूर्योदय होतांना ज्याप्रमाणे पृथ्वीचा एक एक भाग सुप्रभ होत जातो, त्याप्रमाणे त्यांच्या ज्ञानप्रभावाने पृथ्वीवरील कैक देश सुप्रभ होत चालले आहेत. अशा पुरुपाबद्दल परकीयांस सुद्धा अभिमान वाटतो, तर आमांस त्याबद्दल काय वाटावे ? ह्या सत्पुरुषाचें नांव 'श्रीमद्विवेकानंदस्वामी' हे होय. तेव्हां अशा जगाची उलाढाल करणाऱ्या महात्म्याचे जीवनवृत्त ऐकण्याविषयी आबालवृद्धांस उत्कंठा असणे हे स्वाभाविकच आहे. ह्यास्तव त्यांच्या विषयीं थाडी बहुत माहिती आज आमी देत आहों. 'माहिती' असें ह्मणण्याचे कारण इतकेच की, त्यांचे सबंध चरित्र असें कोठेच उपलब्ध नाही. खास्तव त्यांच्या अनुयायांनी जी काय थोडीबहत माहिती कोठे कोठे प्रसिद्ध केली आहे, त्यावरून. व प्रसिद्ध वेदवेत्ते पाश्चात्यदेशनिवासी मातमुल्लरभट्ट, ह्यांनी त्यांच्या गुरूचे में विस्तृत चरित्र प्रसिद्ध केले आहे, त्यातील थोड्याबहत माहितीवरून, व स्वामींच्या मुखांतूनच | वेळोवेळां जे कांहीं उदार निघालेले आहेत, त्यावरून जेवढे जेवढे त्यांचे जीवनवृत्त कळले तेवढेच आजच्या मितीला आमी सांगणार. आणि वाचकांनीही तेवढ्यांतच तूर्त तृप्ति मानून घेतली पाहिजे. दुसरा उपाय नाही. श्रीमद्विवेकानंद स्वामींचें मूळचें-अर्थात् पूर्वाश्रमीचे-नांव नरेंद्रनाथ असें आहे. ह्यांची जन्मभूमि बंगाल इलाख्यांत कलकत्त्याच्या आसोपास आहे. कोणतें गांव ह्याचा ठाम उल्लेख कोठे आढळत नाही. ह्यांचे वय आज मितीला ३०॥३५ वर्षांच्या दरम्यान असल्याचे दिसते. यावरून त्यांचा जन्म सन १८७० च्या सुमारास झाला असावा. ह्यांच्या बालपणाची फारशी माहिती मिळत नाही. तथापि, त्यांच्या भाषणांत प्रसंगोपात्त आलेल्या उद्गारांवरून ते बरेच खेळकर, थाड बहुत हूड परंतु पाणीदार असें असल्याचे अनुमान होते. आमांला जी काही माहिती मिळाली आहे त्यावरून ते आपल्या अठराव्या किंवा