या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. . एकोणिसाव्या वर्षी कलकत्ता युनिव्हर्सिटीचे बी. ए. झालेले आहेत. व त्यानंतर त्यांनी एक सरकारी नोकरीही पतकरलेली होती. प्रथमतः ते बरेच नास्तिकवादी असावेत असे दिसते. कारण, कोणी धर्मोपदेश करतांना आढळला, की त्याच्याशी वादविवाद करण्याची त्यांना अतोनात हौस असे. व अखेर 'तुह्मीं तरी तुमच्या परमेश्वराला प्रत्यक्ष पाहिले आहे काय ?" असा प्रश्न करून त्यास ते निरुत्तर करीत असत. तथापि, त्यांना वेदांतविषय ऐकण्याची, साधुसंतांपाशी जाऊन बसण्याची मनापासून भक्ति असे. असे होतां होतां "भगवान् रामकृष्ण परमहंस" ह्या नांवाचे एक परम विख्यात साधु कलकत्त्याच्या नजीकच रहात असत. त्यांची कीर्ति नरेंद्रनाथांच्या (विवेकानंदांच्या) कानावर आली. तेव्हां ते त्यांच्याही दर्शनास जाऊ लागले. तेथे त्या महासाधूचे कीर्तन व संभाषण ऐकण्यासाठी, दुसऱ्याही पुष्कळ लोकांची दाटी जमत असे, व त्यांत इंग्रजी शिकलेले तरुण होतकरू ग्राजुएट असेही बरेच असत. रामकृष्ण परमहंस ह्यांचे भाषण परम कोमल, अत्यंत मधुर, व अध्यात्मज्ञानाने परिपूर्ण असें असे. त्यामुळ सर्व लोक भ्रमराप्रमाणे त्यावर लुब्ध होत असत. 'कोकिळा मध्य अलीकडे 'सुलभवेदांत' ह्मणून जो सुरस विषय येतो, तो ह्याच महासाधूंच्या मुखांतून निघालेला आहे. त्यावरून त्यांची प्रतिपादनशक्ति किती साधी, सरळ व चित्ताकर्षक होती, ह्याची कल्पना सहज होईल. अशी वेदांतासारखा गहन विषयही अगदी सुलभ रीतीने समजून देण्याची त्या भगवद्भक्ताची अप्रतिम हातोटी असल्यामुळे, प्रत्येक दिवशी सायंकाळी त्याच्या भोवती आबालवृद्धांची गर्दीच गदी हात असे. ते जे काय उपदेशामृत पाजीत, ते सर्व लोक भक्तिभावाने प्राशन करून आनंदभरित होत्साते स्वगृहीं जात. जे कोणी विद्वान्, तत्त्वजिज्ञासू असत, ते त्यावर शंकाही घेत असत; व त्यांचें भगवान् रामकृष्ण फार युक्तीने व शांतवृत्तीने समाधान करीत. अशा प्रकारचा वादविवादही बराच चालत असे. त्या वादविवादांत नरेंद्रनाथ हेच बहधा उत्तरपक्षांतील पुढारी असत. एके दिवशीं परमहंस यांचे नित्याप्रमाणे उपदेशाचे भाषण संपल्या अशी वेदांतासारळ व चित्ताकार. त्यावरून त्या