या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९९. २७३ नंतर ईश्वराच्या अस्तित्वनास्तित्वाचा वाद सुरू झाला. उत्तरपक्षामध्ये बहुतेक मंडळी ग्राजुएट-अर्थात् इंग्रजी शिकलेली असून, तिनें नास्तिक पक्ष उचलला होता. त्याचे परमहंसांनी अनेक प्रकारे दृष्टांत वगैरे देऊन सयुक्तिक खंडन केलें, व परमेश्वराची लक्षणे व खरूप कसें ह्याचेही निवेदन केले. ते त्यांचे अगाधज्ञान श्रवण करून पुष्कळ लोकांचें समाधानही झाले. पण आजचे आमचे चरित्रनायक जे नरेंद्रनाथ त्यांची कांहीं तेवढ्यानेही तृप्ति झाली नाही. त्यांच्याकडून ह्याहूनही आणखी काही महत्वाचे असेल, तें मुखांतून काढावे असे त्यांचे मनोगत होते. परंतु रात्र फार झाली, ह्मणून मंडळी मठांतून उठून घरी जावयास निघाली. त्याजबरोबर नरेंद्रनाथही उठले. आणि जातां जातो आपल्या नेहेमींच्या पद्धतीप्रमाणे एक खोंचदार प्रश्न करून उपदेशकास कुंठित करून तोंड बंद व्हावें, व सर्व लोकांत हशा पिकवावा अशा उद्देशाने थोड्या विनोदयुक्त मुद्रेनें परमहंसांच्या अगदी नजीक जाऊन त्यांस मोठ्याने ह्मणाला "गुरुमहाराज! आपण परमेश्वराची लक्षणे सांगितलेली आह्मीं सर्व ऐकिली. पण असला तो तुमचा परमेश्वर तुमीं तरी स्वतः पाहिला आहे का? का साया | तोडच्याच गोष्टी ?" कसलाही वेदांती असला, तरी ह्या प्रश्नाचें उत्तर देतांना त्याला बहुधा चे चे करण्याचीच पाळी येते. आणि प्रेक्षकांना त्याची उपहास्यता करण्याचा मात्र विषय होऊन राहतो. तेव्हां अर्थात्च त्या नियमाप्रमाणे श्रोतेमंडळीही ह्या प्रश्नाची वाट काय लागते झणून साशंक मुद्रेनें परमहंसांच्या मुखाकडे तटस्थ होऊन पहात उभी राहिली. परंतु भगवान् रामकृष्ण हे महासमर्थ असून पूर्णतेस पोंचलेले होते. ते ह्या प्रश्नावर उत्तर देण्यास घुटमळले तर नाहीतच, पण उलट प्रसन्न मुद्रेने त्यास ह्मणाले "अरे हो हो! मी परमेश्वर पाहिला आहे येवढेच नव्हे, तर तो तुला सुद्धां दाखवून देण्याला तयार आहे. बस खाली." असें ह्मणून फार प्रेमाने त्यांनी त्यास ज्ञानानुग्रह केला. तेव्हांपासून नरेंद्रनाथ हे त्यांच्या फारच भजनीं लागले. ते पहिल्यापासून जरी नास्तिक पंथापैकी होते, व दुसऱ्याची वेदांत विषयांत उपहास्यता करावयाची जरी त्यांस खोड होती, तरी श्रीभगवान् रामकृष्ण परमहंस ह्यांच्याकडे येऊ लागल्या ३५