या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९९. २७६ हणून त्यांत चूकही पण नाही. हा विषय केवळ एकट्या इतिहासाचाच नव्हे, तर धर्माचा, परमार्थाचा, व ईश्वरी तेजाचा आहे. " ज्ञानेश्वर आपेगांवींच जन्मला व आपेगांवींच समाधिस्त झाला." हे ' भारद्वाजांचे निव्वळ थोतांड आहे. त्याला कोणताही आधार नाही. आपेगांवास ज्ञानेश्वराची समाधि असल्याचा दाखला वगैरे काही नाही. काही स्मारक असलेच तर त्यांचा तो मूळ वतनाचा गांव होता हे त्यांच्या चरित्रावरून सिद्धच आहे. त्याला 'बादरायणी संबंध भारद्वाजा सारख्या ' ब्याकबोन' नसाणऱ्या प्राण्यांनी पाहिजे तर ह्मणावें. ज्याला ह्मणून 'स्वात्मतेज' आहे तो असा विसंगतपणा कधी करणार नाही. "हा (ज्ञानेश्वर) निवृत्तिनाथांचा पुत्र व शिष्य होता. (भाऊ नव्हे.)" 'भारद्वाजां'नी हे मत उपस्थित करण्याला एका ओवींतील एकच शब्दाचा आधार आहे. ती ओवी ही: " तेथ महेशान्वयसंभूते । श्रीनिवृत्तिनाथसुते । केले ज्ञानदेवे गीते । देशीकार लेणे ॥ १८०६ ज्ञानेश्वरी अ. १८ 'सुत' ह्या शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये पुत्र असा जरी आहे, तरी अलंकृत भाषेनें गुरुगौरवाकरितां शिष्याने आपणांस-गुरुपुत्र-'सुत ' ह्मणून घेण्याचाही प्रघात आहे. मी आपलें । तान्हें । " लेकरूं' 'बाळ' असें गुरुनिवृत्तिनाथास व संतमंडळांस ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी हटलेले आहे. गुरूचे झणजे निवृत्तिनाथाचे वर्णन व नामोच्चार ठिकठिकाणी आला आहे. 'निवृत्तीचा' ज्ञानदेव असें तर प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आहे. परंतु मी निवृत्तिनाथाचा पुत्र-सुतअसें कोठेही झटलेले नाही. शिष्य' मात्र अनेक ठिकाणी झटले आहे, तेव्हां ह्याच ओवीत तेवढा सुत' हाणजे पुत्र असा अर्थ कसा घ्यावा ? 'पुत्र' व 'शिष्य ' अशी ज्ञानेश्वरांची निवृत्तिनाथाशी दोन नाती असती, तर त्यांनी ह्या अखेरच्या ओवींत तरी 'सुत ' व 'शिष्य ' असे दोनही शब्द घातले अ. सते. ते ज्याअर्थी नाहीत त्याअर्थी येथे सुत याचा अर्थ पुत्र करणे उचित नसून 'शिष्य ' असाच करणे उचित होय. नाही तर आजपर्यंत निवृत्ति, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई ही चार भावंडे ह्मणून वर्णन करीत आलेले महिपति आदिकरून संत व कवि खोटे पडतील, ह्या एका शब्दाच्या संशयित अर्थावरून सर्वांस खोटे पाडण्याचे धाडस कोणाही समंजस मनुष्यास पसंत