या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. पडणार नाही. जे कोणी लग्नादि संसार करीत नाहीत, अशा विरक्तांची परंपरा शिष्यांकडून चालते व त्यांस 'सुत ' असेंही कोठे कोठे झणतात, व त्यांची उल्लेख केला आहे: आर्या. सद्योगगुणमणींची, ज्याच्या हृदयीं, सदा सुखनि वृत्ति, । तो, मज दीना दासा देऊ, दावुनि पदा, सुख निवृत्ति ॥ १॥ आणि कै. वामन दाजी ओक-काव्यसंग्रहकर्ते ह्यांनी निवृत्ति' ह्या शब्दाखाली माहिती दिली आहे ती अशी आहे: "हा आळंदी येथे शा. श. ११९२ त जन्मला आणि त्र्यंबकेश्वर येथे श. १२२० त पौष वद्य ११ चे दिवशी समाधिस्त झाला. हा जातीचा वाजसनेय ब्राह्मण. याचे बापाचें नांव विठ्ठलपंत व आईचें रखुमाबाई. ज्ञानदेव, सोपानदेव, आणि मुक्ताबाई ही याची धाकटी भावंडे. याचा 'वृत्तिबोध' ना. मक ओवीबद्ध ग्रंथ, आणि स्फुट अभंग प्रसिद्ध आहेत. या चवघा भाव विषयी विशेष माहिती महीपतिकृत भक्तविजयाच्या आठवे व नववे अध्या यांत पहावी." मक्तविजय ग्रथांतील माहिती सीच्या अवलोकनांत असल्यामळे येथे पुन अयाजन नाही. काव्यसंग्रहकर्ते किती शोधक व चिकित्सक होते हैं 'पंचवटीस्थलनिर्णयादि वादावरून सर्वांस माहितच आहे. निवृत्तिनाथ हा ज्ञानेश्वराचा पिता असा यत्किचित् जरी सुगावा असता, पर त शब्दाचा अर्थ पुत्र असा असता त्यांचा बहुश्रुतपणा व अवलोकन इतकें दांडगे होते की, त्यांतन ज्ञानेश्वरीसारखा सर्वोत्कृष्ट अथ अरु राहणे केवळ असंभाव्य आहे-तर ते त्याचा उल्लेख केल्यावांचून कधीही राह तेना. मोरोपंतांची आणखी एक आर्या अशी आहे: शंकर निवृत्ति, हरि! तूं ज्ञानेश, ब्रह्मदेव सोपान; । विद्या मुक्ता; तुमच्या कीर्तिसधेचं सदा असो पान ॥ ११॥ ह्यांत निवृत्तिनाथांचा व ज्ञानेश्वरांचा पितापुत्रत्वसंबंध असता, तर त्यांनी नामावळ गुंफतांना बराच फरक केला असता हे उघड आहे. ह्या आर्येखाली 'निवृत्ति, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताबाई ही चार भावंडे होती.' अ६