या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९९. २७७ 'काव्यसंग्रह'कारांची टीप आहे. ह्या सर्वांना खोट्यांच्या वर्गात घालित बसण्यापेक्षां 'सुत ' ह्या शब्दाचा अर्थ 'शिष्य' करण्यांत कोणताच विपर्यास नाही. ह्याहूनही एक सबळ व स्पष्ट पुरावा आहे, तोही येथे दाखल करतो. निवृत्तिनाथाच्या व मुक्ताबाईच्या संवादाचे अभंग मुक्ताबाईने केले आहेत त्यांत एक अभंग असा आहे:" ह्मणे मुक्ताबाई दादा ऐसे वदे । ब्रह्मी होऊ पास वाढिन्नले ॥१॥ ह्यांत मुक्ताबाईनें निवृत्तिनाथास 'दादा' झणजे भाऊ असे स्पष्ट झटले आहे. ह्यावरून मुक्ताबाईंचा भाऊ जर निवृत्तिनाथ, तर ज्ञानेश्वराचाही तो भाऊ असला पाहिजे हे उघड आहे. आणखी निवृत्तिनाथादि चार भावंडे ही जर संन्याशीच मुले होती; त्यांच्यावर जर ब्रह्मवृंदांनी बहिष्कार ठेवून उपनयनादि संस्कारही केले नाहीत, तर निवृत्तिनाथांचे लग्न झाले नाही हे उघडच आहे. मग त्यांना मुलगा होणार कसा? "ज्ञानेश्वरी नेवाशास लिहिली याला सबळ आधार मुळीच नाही." ह्याला 'सबळ आधार ' विचारणे झणजे चैत्रवैशाखांतील दोनप्रहरी सूर्य कोठे आहे ह्मणून विचारण्यासारखे आहे. ह्या मुद्याचाही ऊहापोह पुढें लौकरच होणार असल्यामुळे येथे अधिक विस्तार नको.. " नामदेव १३०० शकांत झाला. त्याच्याबरोबर तीर्थयात्रेस गेलेला जो ज्ञानदेव तो वेगळा होय. ज्ञानेश्वरीचा कर्ता तो नव्हे. हा आळंदीस समाधिस्थ झाला. निवृत्ति, सोपान वगैरे भावंडे ती ह्या ज्ञानदेवाची. ही सर्व संन्याशाची मुलें. ह्यानेही निवृत्तिनाथाला गुरु केले होते. रेड्याच्या मुखाने वेद बोलविणे, भिंत चालविणे हे सर्व चमत्कार ह्या ज्ञानदेवाचे ! झणजे 'ग्यानबा'चे !! हे 'ग्यानबा' जन्मास आल्यानंतर पहिल्या मणजे ज्ञानेश्वरीका ज्ञानदेवास ज्ञानेश्वर ह्मणूं लागले." ज्ञानेश्वरीका ज्ञानदेवांच्या मागचे अद्भुत चमत्कार काढून टाकण्यासाठी त्यांच्या मागून दुसरा ज्ञानदेव जन्मास घालून त्याचे मागें रेड्याचे वगैरे लचांड लावून त्यास आळंदीत समाधि द्यावयाची ! बरें; हेही असो. पण ह्या दुस-या शंभर वर्षांच्या मागून जन्म घेणाऱ्या 'ग्यानबां'ना उपदेश द्यावयाला निवृत्तिनाथ कोठचा ? ह्याची काही वाट ? पण सुधारकांच्या टांकशाळेंत संतोत्पत्तीला दुकाळ तो कसला ? 'भारद्वाजां'नी ज्ञानदेव जसे दोन बनविले, तसेच निवृत्ति