या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. नाथही दोन करून सोडले !! सयुक्तिक तर्क काढला, तर मनुष्य त्यावर काहीतरी उत्तर देईल. पण कुतर्कच काढीत बसणारास मनुष्याने उत्तर तरी काय द्यावें ? तथापि आपणाकडून जेवढे समाधान करणे अवश्य दिसेल, तितकें तरी, केले पाहिजे. ज्ञानेश्वराच्या संबंधाने तुकारामाचे अभंग असे आहेत:ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । ह्मणती ज्ञानदेव ऐसे तुह्मां ॥१॥ मज पामरा हे काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ॥ २ ॥ ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे । इतर तुळणे काय पुरे ॥ ३ ॥ तुका ह्मणे नेणे युक्तीची ते खोली । ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥ बोलिली लेकुरें। वेडीं वांकुडी उत्तरे ॥ १ ॥ करा क्षमा अपराध । महाराज तुह्मी सिद्ध ॥ २ ॥ नाहीं विचारिला । अपराध म्यां आपुला ॥ ३ ॥ तुका ह्मणे ज्ञानेश्वरा। राखा पाया किंकरा ॥ ४॥ जयाचिया द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसे बळ रेडा बाला ।। करील ते काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध आगी॥ जेणे हे घातली मुक्तीची गवांदी। मेळविली मांदी वैष्णवांची ॥३॥ "हण तथ सुखा काय उणें । राहे समाधाने चित्ताचिया ॥४॥ अभगामध्ये ज्ञानेश्वरांनी अद्भुत चमत्कार केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. व 'सोन्याचा पिंपळ' हे आळंदीगांवाचे दर्शक आहे, व 'ज्ञानियाचा गुरु' इ. त्यादि विशेषणांवरून ज्ञानेश्वरी केलेले जानदेवही हेच होत असें विचारांती सहज समजणार आहे. आतां मोरोपंतकवींचा ज्ञानेश्वराविषयी थोडासा उल्लेखः आर्या. जो ज्ञानराज भगवान् श्रवणीं सुज्ञान दे वदे वाचा; । पर अवतार गमे अकरावा कां सज्ञान देव देवाचा ॥ १ ॥ १ ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत ह्यांनी संन्यास घेतला असतां, ज्ञानेश्वरमहाराजांच्या मातोश्रींनी ज्या पिंपळास प्रदक्षिणा घातल्या, तो हाच पिंपळ. तो अद्याप सोन्याचा पिंपळ' ह्मणून आळंदीस प्रसिद्ध आहे.