या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९९. २७९ कोणा जडा न होशिल सुगतिप्रद जाहलासि भिंतीतें । श्रीरामाचे तैसें, तव यश सजनसमाज चिंती तें ॥२॥ ज्ञानेशा ! जे जाड्य, त्वत्तेजे क्षिप्र ते विरे; डाजो। खळमानसी प्रताप; श्रुति वदला विप्र तेंवि रेडा जो ॥ ३॥ श्रीमद्भगवद्गीताव्याख्या केली जगासि ताराया। fup-dhir सारा या सद्रंथा सेविति, संसारताप साराया ॥ ४ ॥ श्रीहरिहरकीर्ति तशा बा! विश्वास प्रिया तुझ्या ओव्या । जो व्यास तोहि बहुधा ह्मणतो, श्रुतिशाचिया मला होव्या॥५॥ ज्या ज्ञानेश्वरांनी अद्भुत चमत्कार केले, त्याच ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' ही सर्वोत्कृष्ट गीतेची टीका केली अशाबद्दल मोरोपंतांची तर चोख-अगदी सोळा आणे-साक्ष झाली. पण ह्या अर्वाचीन काळच्या साक्षी 'भारद्वाजां'सारख्या पठ्या सुधारकांना कशाचा पटणार ? ह्याकरितां आतां कांही प्राचीन साक्षींचा प्रयत्न करू या. सेना न्हाव्याचे अभंगःवाचे उच्चारी जो ज्ञानदेवासी । तयाच्या सुकृतासि नाहीं पार॥१॥ पूर्वीचे सुकृत फळासि आलें । वाचे उच्चारिलें ज्ञानदेवा ॥ २ ॥ या अलंकापुरी आला जन्मासी । पूर्वज तयासी मानिती धन्य॥३॥ सेना ह्मणे त्याने उद्धरिलें कूळ । पूर्वज सकळ आशीर्वाद देती॥४॥ येउनि नरदेहासि वाचे उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झाला गे माय॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्म येऊनि अवतारासी । तारिले जगासि नाममात्रे ॥२॥ जयाचे अंगणी पिंपळ सोनियाचा। सिद्ध साधकांचा मेळा तेथे॥३॥ तयाचे स्मरणे जळति पातकें । सांगत पंढरिनाश सेना ह्मणे ॥४॥ वैकुंठवासिनी कृपावंत माउली । जगा तारावया अळंकापुरा आली ॥१॥ शिव तो निवृत्ति आदिमाया मुक्ताबाई । ब्रह्मा तो १ "ज्ञानेश्वराचा प्रताप खळांच्या मनामध्ये डाचूं द्या" हा टोला पंतांनी जणों काय 'भारद्वाजां'ची पुढील लीला मनांत आणून आधीच देऊन ठेवला की काय असा भास होतो !! ह्या आर्यातील यमकचातुर्याचा व प्रस्तुत वादाचा योगायोग फार ध्यानांत ठेवण्यासारखा आहे.