या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९९. २८१ आळंदीसच समाधिस्त झाला; त्याने आपली ज्ञानेश्वरी नेवाशास लिहिली; व आपेगांवचे त्याने आमरण दर्शनही घेतले नाही, तर मग वर दिलेला "आणि महाराष्ट्र परिकळी" हा शेरा ज्ञानेश्वरीच्या शेवटी मारण्याचे काय प्रयोजन ? 'निवास' ह्या सामासिक पदांतील शब्दाचा नेवासें असा अर्थ करणारे डोके मोठे कल्पक दिसतें ! नेवासें हे अनादि पंचक्रोशी क्षेत्र नाही. तें प्रवरेच्या काठी आहे. 'महालया' स्त्रीवाचक शब्द आहे, हिकडे लक्ष्य दिले पाहिजे. 'दक्षिण लिंगी' शब्दाच्या कुंट्यांनी चिंध्या उडविल्या आहेत ! 'दक्षिण' ह्मणजे शाक्तांचे मत विशेष असा माझा तर्क झाला. व तो आपेगांवास जा. ऊन पाहतां खरा ठरला. तेथें कोनाड्यांत देवी आहे; तिच्या हातांत खड्ग आहे, ती सिंहारूढ आहे. सर्व ध्यान शाक्तासी तुल्य आहे. व आपेगांव प्रतिष्ठान ह्या अनादिक्षेत्रापासून चार कोस असल्यामुळे पचक्रोशीत आहे. ह्या सर्व गोष्टींवरून ज्ञानेश्वराचे जन्मस्थान आपेगांव असे दिसतें."ship ह्या मुद्याचे उत्तर देण्यापूर्वी भारद्वाजांनी वर निर्दिष्ट केलेला, ज्ञानेश्वरीतील शेवटचा शेरा कोणता तो दिला पाहिजे. तो शेरा हाः ऐसे युगी परिकळी । आणि महाराष्ट्र मंडळी । श्री गोदावरीच्या कूलीं। दक्षिणिली ॥ ३ ॥ त्रिभुवनैक पवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र । जेथ जगाचे जीवनसूत्र । श्रीमहालया असे ॥ ४ ॥ तेथ यदुवंश विलास । जो सकळकळानिवास । न्यायातें पोषी क्षितीश । श्रीरामचंद्र ॥ ५ ॥ तेथ महेशान्वयसंभूते । श्रीनिवृत्तिनाथसुते । केले ज्ञानदेवे गीते। देशीकार लेणे ॥६॥ होय, ज्ञानेश्वरांनी नाही घेतले आपेगांवचे दर्शन. आणि ज्ञानेश्वरी ही नेवाशांत लिहिली. ह्मणून ह्या शेरा मारण्याने कोणती गोष्ट बिघडली १ कोणता प्रमाद घडला ? ह्या शेांत-हणजे वर दिलेल्या ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ओंव्यांतज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी लिहिली किंवा पुरी केली, त्या स्थानाचा निर्देश केला आहे. आणि ह्यांत निर्दिष्ट केलेल्या लक्षणावरून ज्ञानेश्वरी ही आपेगांवास