या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. लिहिली असा भारद्वाजां'ना भ्रम उत्पन्न झाला आहे. पण तो निव्वळ चुकीचा आहे, तसा भ्रम प्रथमच ज्ञानेश्वरी पाहणाराच्या मनांत उत्पन्न होण्यासारखी त्यांत एक दोन कारणेही आहेत. त्यांचा खुलासा केला झणजे तो भ्रम सहज निघून जातो. ह्याकरितां वरच्या ओव्यांत जे भ्रामक कल्पना उत्पन्न करणारे शब्द आहेत, त्यांची आधी फोड करणे जरूर आहे. पण त्यापूर्वी वरील ओंव्यांचे एक वेळ सरळ गद्यात्मक भाषांतर येथे देतो. हाणजे सर्वांस पुढील विचार समजण्यास पुष्कळ सोपें पडेल. वरच्या ओव्यांचा सरलार्थ असाःभा" ह्याप्रमाणे कलियुग चालू असतां, महाराष्ट्रदेशामध्ये, श्रीगोदावरीच्या दक्षिणतीरी, त्रिभुवनांत अत्यंत पवित्र असें जें अनादि पं. चक्रोशी क्षेत्र, ज्यांत जगाचें केवल जीवनसूत्रच अशी जी महालया तिचे वास्तव्य आहे. जेथें यादववंशास भूषणभूत, व सकलकलासंपन्न असा श्रीरामचंद्र राजा न्यायाने राज्य करता आहे. शंकरापासन चालत आलेल्या गरुपरंपरेतील श्रीनिवृत्तिनाथाचा । प्यरूप पुत्र जो ज्ञानदेव, त्याने हा गीतेला प्राकृतभाषेचा अलंकार घातला." (पुढे चालू. ) TARTS पुस्तकपरीक्षा. मुबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा पहिला वार्षिक रिपोर्ट हे ग्रंथसंग्रहा लय वाही आह्मांस प्रसंग आला होता. मंडळीचा उद्योग अत्यंत ठमोठे विद्वान् , ग्रंथकर्ते, व छापखान्यांचे मालक अशा गृहस्थांचे ह्यांत आंग आहे. ही संस्था अद्याप बाल्यावस्थेतच आहे,' थापि तिचा ग्रंथसंग्रह बराच वाढलेला आहे. चालक मंडळी निरपेक्ष मा श्रम करीत असून त्यांची उमेद व तरतरी तारिफ करण्यासारखी आ ह्यावरून ही संस्था थोड्याच कालांत नांवलौकिकास येईल असा भरंवसा वाटता। मात्र तीस हस्ते परहस्तें सहाय करणे हे आपले कर्तव्य आहे, असें महाराष्ट्राता हितेच्छंनी मनांत वागविले पाहिजे. तशी ईश्वर त्यांस प्रेरणा करो. सवालांस प्रतिसवाल-प्रो. राजारामशास्त्री भागवत यांनी केलेल्या 'ब्राह्मण ह्मणवणारांस सवाल' ह्या व्याख्यानाचे विचार, व त्यावर उत्तरे देणारांची