या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९९. २८३ झालेली धांदल, वर्तमानपत्रांवरून सर्वश्रुत झालीच आहे. प्रोफेसर मजकुरांचे माथें अघटित विचारांनी कसें भ्रमत असते, ह्याची साक्ष आमच्या 'कोकिळांतील' 'म-हाठ्यांविषयी चार उद्गार' ह्या पुस्तकपरीक्षेवरून व त्यांच्या इतरत्र चमकत असलेल्या पुस्तकमालिकेवरून व विचारमालिकेवरून बहुतेक महाराष्ट्रीयांस पटलेलीच आहे. त्याच मासल्याचे हे सवाल होते. त्यांस उत्तर ह्मणून हे पुस्तक-पूर्वीचे व्याख्यान-रा. रा. बाळकृष्ण गणेश योगी ह्यांनी तयार केले आहे. व ठिकठिकाणी विवाहादिप्रयोगांतील वचने देऊन त्यांनी आपले मणणे फार चांगल्या रीतीने लोकांपुढे मांडले आहे. अर्थात् प्रोफेसर साहेबांचें झणणे खोडून काढले आहे, हे निराळे सांगणे नकोच. ह्या पुस्तकांत विशेष तारीफ करण्यासारखी, व कित्ता घेण्यासारखी गोष्ट ही, की, प्रतिपक्ष हटला की, त्याची टर करावयाची, विनोद करावयाचा, त्याच्या झणण्याचा ठिकठिकाणी उपमदें व उपहास करून मर्मभेदक शब्द वापरावयाचे अशी बहुधा चाल दृष्टीस पडते. पण रा. योगी ह्यांनी यत्किंचितही तसा प्रकार केला नाही, तर उलट तसा प्रकार करणे कोणासच उचित नव्हे असे सांगून-इतकेच नव्हे तर पूर्वपक्षाचा मोठा गौरव करून -आपले मुद्दे अत्यंत सरलतेने व सभ्यपणाने प्रतिपादन कले आहेत. 'बायकांची मुंज.' 'चातुर्वर्ण्य' इत्यादि विषयजिज्ञासूंनी हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे. ग्रंथिकसन्निपात–हें पुस्तक रा. रा. शंकर दाजीशास्त्री पदे-आर्यभिपक्कर्ते ह्यांनी लिहिले आहे. ह्यांत माहिती पुष्कळ आहे. नव्या नव्या शोधांचा साधक बाधक विचार केला आहे. सरकारास पुष्कळ प्रकारच्या सूचना केल्या आहेत. स्वच्छता राखणे, टोचून घेण्यापासून नफे तोटे, काही औषधी इत्यादि सांगितल्या आहेत. वाचावें; त्यांतील गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. पण ज्याच्यावर तो भयंकर प्रसंग गुदरेल, त्याला त्या समयीं किती उपयोग होईल हा मात्र प्रश्न आहे ! प्लेग हे काय आहे व त्याची बाधा न होण्यास उपाय-हे सुमारे २० एक पानांचे छोटेखानी पुस्तक रा. रा. वामन बाबाजी महाजन-प्रवास-गृहवैद्य-पेटीचे मूळकर्ते ह्यांनी लिहिले आहे. ह्यांत रोगांचे काही वर्णन आहे; कांहीं संस्कृत ग्रंथांतील माहिती आहे; कांही स्वच्छता ठेवण्याचे नियम आहेत; कांही टीका आहे आणि काही त्यावर 'खात्रीचे' व 'रामबाण उपाय व औषधे आहेत. आणखी पुस्तककार ह्मणतात "डा० भालचंद्र,