या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. जस्टिस रानडे, कौन्सिलर छत्रे, वैद्य पदे इ. पुष्कळ बडे लोकांची शेकडों पसंतीपत्रे असून तिसरे भागांतील प्लेगची ठिकाणे व शोध आणि औषधियोजना यांची फारच स्तुति केली आहे. ही औषधे व बुके तयार झाल्याबरोबर आमचेकडे पाठवा अशा पुण्यांतीलच शेकडों मागण्या आल्या. यावरून औषधांची व बुकांची ३ हजार प्रत लौकरच खपून जाऊन सर्व तयारी पुनः लौकरच करणे भाग पडण्याची चिन्हें दिसत आहेत." बडे लोकांची शेकडों पसंतीपत्रे मिळाली; तीन हजार प्रति खपल्या; औषधांच्या मागण्या आल्या; हे सर्व पुस्तककर्त्यांच्या संबंधाने ठीक झाले. कल्याणाची गोष्ट !! पण लोकांना पाहिजे तो गुण पाहिजे, तो कितीकांना आला ? शेकडा किती लोक वांचले १ तेवढे मात्र ह्या पुस्तकांत नाही ! त्याची खात्री पुढे पुस्तककर्ते करून देणार आहेत. तोपर्यंत 'रामबाण' व 'खात्री' कोणाची ? स्वतःचीशी दिसते. तात्पर्य काय, की, ही औषधे कोणकोणांस दिली, त्या रोग्यांची नांवें, व त्यांतून किती वांचले त्यांची नांवे हा तक्ता जर नाही, तर भरीव असलेले पांडित्यही पोकळच होय ! हा तक्ता जोडला तर, पुष्कळ प्रकारे लोकांचा विश्वास बसेल. "जरी हवा बिघडते असें झटले, तरी ती बिघडलेली हवा आपली नेहेमींची ऊर्ध्वगति सोडून तळमजल्यापर्यंत मुद्दाम खालचे अधोगतींतच सारखी घोंटाळत कशी राहील ?" हवेचे खालचे थर घन असून त्यांत प्रवाहही कमी असतो, ह्या साधारण नियमावरही जर उलट पांडित्य, तर पुढे काय बोलावें? तथापि पान ७।८ मधील नवव्या कलमांतील मजकुरासारखे काही भाग ध्यानात ठेवण्यासारखे व उपयुक्त आहेत, ह्यास्तव एकवार पुस्तक वाचलेले असलेले बरें. ENSE पत्रव्यवहार ॥ श्रीरामचंद्रप्रसन्न. ॥ तुका ह्मणे सुख पराचिया सुखें । अमृत हे मुखे स्त्रवतसे. रा० रा. 'केरळकोकिळ' कर्ते यांस:वि. वि. 'केरळकोकिळा'च्या द्वारे आपण आरंभिलेला उद्योग किती पवित्र व स्तुत्य आहे हे माझ्याने लिहून दर्शववत नाही. पूर्वी राजेलोक अथवा शहाणे लोक एखाद्या नवीन मनुष्याच्या अंतस्थ स्वभावाची खरी ओळख करून घेण्यासाठी त्यास नानाप्रकारच्या वस्तुसंग्रहशाळेत घेऊन जात असत, व त्याचें ज्या वस्तकडे अधिक लक्ष्य पोंचतें त्यावरून त्याच्या मनाची योग्यता जाणीत असत.