या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९९. २८६ हा प्रयोग सांप्रतही कुठेकुठे थोर व जाणत्या लोकांच्या घरी दृष्टीस पडतो. त्याप्रमाणे हल्लीच्या काळी, अरसिक मनुष्य कोण आहे अथवा आत्मोन्नतीचा कं. टाळा आलेला पुरुष कोण आहे हे ओळखून काढणे असेल तर आपले 'केरळकोकिळ' मासिकपुस्तक त्याजकडे दिले असतां चांगले समजून येईल, अथवा त्या कामी 'केरळकोकिळ' हे एक उत्तम साधन होऊन बसले आहे हाणण्यास हरकत नाही. आतांशा त्यांतील विषय वाचून तर त्या पुस्तकास 'केरळकोकिळ' हे जुनें व एकदेशीय नांव शोभत नाहीसे झाले आहे. त्या मधुरध्वनि 'कोकिळास' 'केरळ' या विशेषणांऐवजी स्वर्गीय नंदनवनांतील, ज्ञा• नामृत पाजणारा अशा अर्थाचे किंवा याहीपेक्षा काही व्यापक व गोड अर्थाचें विशेषण असेल तर फार बरे होईल, असे दिसते. आपल्या पुस्तकास वर्गणीदार थोडे आहेत-निदान, असावे तितके नाहीत-तरी इतर प्रेमाचे वाचक त्यांच्या आठपटीने असतील असें स्वतःच्या अनुभवावरून दिसून येते. या गोष्टीचा आपणास मनानेच आनंद व अभिमान मानण्याशिवाय दुसरा फायदा नाही ही गोष्ट निराळी. तरी ही उणीव देखील ईश्वरकृपेनें लौकरच भरून येईल अशी मी आशा करितो. 'राजयोगा'प्रमाणेच 'सुलभवेदांत' हा विषयही माझा अत्यंत आवडता होऊन राहिला आहे. तो वारंवार वाचून पाठ करावा असेच वाटते. त्या अमृतमय वचनांची भाषांतरें मी इतर काही वर्तमानपत्रांत वगैरे वाचली होती. पण ती केवळ भाषांतरें असल्यामुळे त्यांत रसांतरही झाले होते. ह्मणून ती वेषांतर केलेल्या ढोंगी साधूप्रमाणे ओळखितां येत असत. त्यापासून जिज्ञासु-- बुद्धीला अधिक सुख ते काय होणार ? आपली भाषांतर करण्याची शैली पूर्वीपासून प्रसिद्धच आहे. गहन विषयाला आपल्या शब्दांनी (भाषेनें) सुगम करून वाचकांच्या मनांत त्याचा ठसा उमटविणेंची हतोटी आपणास उत्तम साघली आहे. त्या योगाने आपण लिहिलेला विषय वाचतांना दोहींपरी आनंद होतो. आपण पुस्तकपरीक्षण सणसणीत लिहितां; तें मुख्यतः त्याला पुस्तककत्यांनी विचार करून आपले-स्वत:ला अज्ञात असे-दोष सुधारून आपला फायदा करून घ्यावा ह्मणून, व क्वचित् स्थळी आपल्या प्रियवाचकांनी उत्तम ग्रंथांचा संग्रह करावा ह्मणून. पण या उद्देशाशिवाय वाचकास त्यापासून आणखी किती फायदे होतात, किंवा वाचक करून घेतात, हे आपणास सुद्धा ठाऊक नसेल असें घटकाभर झणण्यास हरकत नाही. त्यापासून खरोखर तारतम्यवि