या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८६ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. चार, सूक्ष्मबुद्धि, व स्वतः अध्ययन करून संपादिलेल्या ज्ञानापेक्षा अधिक उत्तम ज्ञान व इतर विपुल माहिती त्यांना मिळते. याप्रमाणे 'कोकिळा'ची शिफारस करावी तेवढी थोडीच वाटते. असो. आतां, गुरूंनी एकदां शिकविलेल्या गोष्टींत त्यांजकडूनच दुसऱ्या वेळी विरुद्धपणा आलेला दिसला ह्मणजे शिष्यवर्गाची जशी धांदल उडून जाते, व मग त्या गोष्टीचे निराकरण अथवा समाधान करून घेण्यासाठी ते जसे उतावीळ होतात, त्याप्रमाणे मी आपणास एक शंका विचारणार आहे, त्याचे आपल्याकडून समाधान लवकरच होईल अशी मी आशा करितो. शिष्यप्रेमासाठी अथवा आपलेविषयी त्यांचा गैरसमज होऊ नये ह्मणून उत्तर देणे त्यांस जसें योग्य आहे-मग तो शंका विचारणारा एकटा . असो वा अधिक समुदाय असो त्याप्रमाणे मी एकट्यानेच ही शंका विचारली ह्मणून त्याचे समाधान करण्यास आपण आळस करणार नाही अशी माझी खात्री आहे; ती शंका ही:-आपल्या गेल्या जुलईच्या अंकांत "सुलभवेदांतांतर्गत एकतिसाव्या कलमांत "तुझ्या अज्ञानमय दिवसामध्ये तुला ईश्वर दिसत नाही." इत्यादि लिहून अज्ञानाला दिवसाची उपमा व ईश्वराला ताज्याची उपमा दिलेली दिसते. तरी हे आपण इ. स१८९८ चे मेच्या अंकांत 'अहल्याचरितकाव्य' पुस्तकावर दिलेल्या अभिप्रायांत 'अनुचितार्थत्वदोषा'चे उदाहरण दिले आहे, त्याप्रमाणे घडत नाही काय ? पुष्कळ संस्कृत व प्राकृत ग्रंथांमध्ये अज्ञानाला अंधकाराची व ज्ञानाला प्रकाशाची उपमा दिलेली आढळत्ये; व तीच सर्वांशी योग्य वाटते. असे असतां आपण असे लिहिले याचा अर्थ समजत नाही. ते इंग्रजीचे भाषातर असेल तर (आणि तें आहेच, पण) आपण तसाही कुठे उल्लेख केला नाही. परमपूज्य श्रीरामकृष्ण परमहंसांची ही वचने-जी परदेशीय पंडितांनीही आपल्या भाषेत लिहून आपला गुणग्राहकपणा जगास दाखविला, त्यांचे आपण मराठीत भाषांतर करून महाराष्ट वाचकांस त्यांचा लाभ करून देण्याच योजिले आहे. त्याबद्दल आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत. पण ते परमपूज्य नाम "श्रीरामकृष्णपरमहंस'-की ज्याचे श्रवणमात्र होतांच मोक्षमुल्लरभट्टासारखे पाश्चिमात्य विद्वच्छेष्ठ पुरुषही मनःपूर्वक वंदन करितात व प्रेमाने सद्गदित होतात,-तें या "सुलभवेदांता"च्या माथ्यावर आपण कां सुशोभित केलें नाहीं ? किंवा ते करणे आपणास योग्य वाटले नाही, अथवा दुसरीकडे कोठे केले असेल तर कळविण्याची तसदी घ्यावी.