या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. नीतीने करसल, तर है" जर माझा ह्या अनेक सरदार व मानकरी ह्यांनी तिच्यापुढे होऊन लवून तिला मुजरे केले. पण तिचा चेहरा अगदी निस्तेज होऊन छाती धडधडत होती. तरुण राजपुत्र पूर्वीच मरण पावला होता, ह्मणून सर्व लोकांनी हिलाच नेऊन तेथील तक्तावर बसविलें, व रीतीप्रमाणे पट्टाभिषेकसमारंभ झाला. दरवारास जमलेल्या सर्व लोकांनी हीच इंग्लंदची राणी ह्मणून मान्य केली. व तिचे संरक्षण करण्याबद्दल त्यांनी शपथाही घेतल्या. पण तेच तिच्या मनाला व काळजाला धक्का बसण्यास कारण झाले. तिने एकदम मोठ्याने हंबरडा फोडिला, व त्यासरशी ती धाडकर जामनीवर पडली. ती बराच वेळ निचेष्ट होती. तिचा चेहरा अगदी पांढरा फटफटीत दिसत होता, व डोळे मिटले होते. शुद्धीवर आल्यानंतर ती उठली, तिने गुडघे टेकले, आणि हात जोडून परमेश्वराची प्रार्थना केली की, “जर माझा ह्या सिंहासनावर बसण्याचा हक्क न्याय्य असेल, तर हे प्रभो! मला हे राज्य न्यायाने आणि नीतीने करण्याचे सामर्थ्य दे." येणेप्रमाणे पट्टाभिषेकसमारंभ तर आटोपला. पण ते केवळ शि. राळशेटीचे राज्य होते. कारण, हें सिंहासन कांहीं एकट्या लंदन शहराचेंच नव्हते; तर सर्व इंग्लंद देशाचे होते. तेव्हां एका लंदन शहरांतलेच लोक अनुकूल करून घेण्यांत काही अर्थ नव्हता. ते उभयतां व्याही व्याही, आनंदाच्या भरांत आणि मनोराज्याच्या धांदलींत ही मुद्याचीच गोष्ट विसरले. आणि त्याचे फळ बिचाऱ्या त्या निरपराधी व सत्त्वस्थ तरुण दंपत्यास भोगावे लागले. मेरी राणी, ही राजाची सख्खी बहीण असून राज्याची खरी वारसदारीण ही गोष्ट सान्या इग्लंद देशाला माहीत होती. तेव्हां हा येवढा धडधडीत अन्याय त्यास कसा सहन होणार? किल्लयांत जरी हा प्रकार झाला, तरा सर्व देशभर मेरी राणीचें नांव दमदमत राहिले होते. त्याचा प्रतिध्वनि हां हां ह्मणतां लंदन शहरांत येऊन पोचला. जिकडे तिकड वाटाघाट चालू झाली. सभांवर सभा भरूं लागल्या. व अखेर मेरी राणीला सिंहासनावर स्थापन करण्यासाठी किल्ल्यावर लोकांचा हल्ला आला. तेव्हां ह्या व्याह्याव्याह्यांचे डोळे उघडले. परंतु पश्चाहुद्धीचा उपयोग तो कितीसार