या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९८. २६७ आरंभीच्या मूलाधार चक्रापासून तों, मेंदूमध्ये असणारे जे 'सहसार-सहस्रदलकमल-तेथपर्यंत योगी अनेक चक्रं असल्याचे कल्पितो. ह्याकरितां, त्या चक्रांच्या ऐवजी आपण निरनिराळे मज्जाकंद घेतले, तर योग्याची कल्पना अर्वाचीन शारीरशास्त्रभाषापद्धतीप्रमाणे सुद्धा अगदी सहज ध्यानात येईल. ज्ञानतंतूंच्या प्रवाहामध्ये दोन तन्हेच्या क्रिया असलेल्या आपणांस माहितच आहेत. एक केंद्रोद्वाहक आणि दुसरी केंद्राभिवाहक किंवा एक ग्राहक आणि दुसरी प्रतिसारक. एक बाहेरील ज्ञान मेंदूकडे घेऊन जाते, आणि दुसरी मेंदूतील ज्ञान शरीराच्या बाह्य प्रदेशावर आणते. हे सारे ज्ञानरसप्रवाह एका लांब ज्ञानतंतूंतून जाऊन मेंदूस मिळालेले असतात. पुढील विवेचनाचा मार्ग अधिक खुला होण्यासाठी आपणांस आणखीही कित्येक गोष्टी ध्यानांत ठेवल्या पाहिजेत. ह्या पृष्ठरज्जूच्या वरचा शेवट, मेंदूजवळ मगजामध्ये एक प्रकारचा गोळा आहे, त्यांत असतो. हा गोळा मेंदूला लागलेला नसतो. तर मेंदूतील एका प्रकारच्या रसांत तरंगत असतो. असा की, मस्तकावर एखादा तडाका बसला तर, त्याच्या आघाताचा लय त्या रसांत व्हावा, आणि त्या गोळ्याला इजा होऊ नये. पुढील विवेचनामध्ये ही गोष्ट फार महत्वाची असल्याचे दिसून येईल. दुसरें, साऱ्या चक्रांचीही आपणांस माहिती असली पाहिजे. विशेषेकरून तीन तर ध्यानांत पाहिजेतच. ती तीन मणजे एक मलाधार (खालचे चक्र), दुसरें सहस्रार ( मेदूतील सहस्रदलकमल) आणि तिसरें खाधिष्ठान (नाभिचक्र) ही होत. नंतर पदार्थविज्ञानशास्त्रापैकीही एक तत्त्व आपणांस लक्ष्यात ठेविले पाहिजे. विद्युत् आणि तिच्याशी संयुक्त असलेल्या इतर शक्तींविषयीही आपण सारे ऐकतो. विद्युत् झणजे काय आहे हे कोणासच कळलेले नाही. तरी जेथपर्यंत तिचा शोध लागलेला आहे, तेवढ्यावरून ती एक त-हेची शक्ति आहे इतकें मात्र समजते. लाग णार परंतु जगामध्ये दुसऱ्याही अनेक शक्ति आहेत. तेव्हां त्यांच्यामध्ये आणि विजेमध्ये भेद काय ? समजा; की हे टेबल हालतें; ह्याचे कारण, तें ज्या परमाणूंचे बनलेले आहे, ते परमाणू भिन्न भिन्न दिशेने जाऊं लागतात. ते सारे एकाच दिशेने जाऊं लागतील तर, ती वीज