या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. ऐकतां निधनवृत्त अशाचें । कोसळून पडले नभ साचें । जाय सर्व जनचित्तविसांवा । लोकशोक मग काय पुसावा? ॥ ९ ॥ राजमान्य सुहृद खजनांचा । जो उदार, अति थोर मनाचा । गर्व लेश न मिळे हृदयास । येत जेथुनि दया उदयास ॥ १० ॥ सत्तत्वांचा चहाता, विनय नयपटू, धोरणी फार उक्त सर्वांचा योग्य मंत्री, विबुधवर भला, जो सदुद्योगभक्त । If | राष्ट्राचा भव्य टेंका, नरवर, उजवा हात जो स्वप्रभूचा दुर्दैवें दिव्य तारा, हरहर ! तुटला आज ह्या आर्यभूचा ॥ ११ ॥ ज्ञानाचा हा कळस पडला वाटतें आज एक गेला गेला शिव शिव ! गमे मूर्त हा सद्विवेक । सौख्याचा हा अहह ! मुकला, पूर्ण ठेवा, अह्मांला हा! हा! नाना फडणिस दुजा भाग्यशाली निमाला ॥ १२ ॥ नववधू, नववेष, सुधारणा । नटुनियां जनदुःखनिवारणा ।' अवतरे रमणी रमणीय ते । कवण जोड तिच्या कमनीयते! ॥ १३ ॥ हंसत येउनि दर्शन देतसे । परि दिसे विधिला रुचले नसे। अजि तिचें हरिलें, अदयें ! तयें। अहह ! मंगलसूत्रचि हे खयं ॥ १४ ॥ प्रियकर विदुषी जी थोर भार्या सुशीला । तिजवर पडली ही घोर हो तप्तशीला । प्रियपतिविरहाचा फार मोठा प्रसंग । मृदुल हृदय तीचे होय दुःखें दुभंग ॥ १५ ॥ कवण करिल कैसें ? तत्समाधान आजी । परि नृहरिकृपेला, राहणे नित्य राजी । उघड उघड आहे मृत्युचा लोक हा की। ह्मणुनि बुध विवेकें सर्वही शोक टाकी॥१६॥ सकल भरतभूची, तत्कुटुंबी जनांची । अहह ! परम हानी जाहली आज साची । तरि तुजसम माते! सर्व आह्मी अभागी । तव पतिविरहाचे अल्प आहों विभागी १७ स्मरुनि तव गुणांतें न्यायमूर्ते! उदारा! भरुनि नयन येती लागती अश्रुधारा । किति तरि तव आत्मा थोर त्या वासुदेवें । उपरि तुजशि द्यावी पूर्ण शांती सुदैवें १८ तव गुण पुढिलांनी नीट आणोनि चित्ता । सुरुचिर वळवावा नित्य हा थोर कित्ता। विनवुनि जगदीशा स्वस्थ आतां रहावें । फिरुनि भरुनि काढी कोण जागा पहावें १९ दुःखावेशें हृदय भरलें. दाटला कंठ फार नेत्रांतूनी टपटप गळे अश्रुबिंदू अपार । झाले शून्य त्रिभुवन, कळा लोपली की रवीची चालेनाही हरहर ! पुढें कल्पना ह्या कवीची ॥ २० ॥ SHSERIF