या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५१५. मृत्यु न ह्मणे थोर थोर । मृत्यु न ह्मणे हरिहर । मृत्यु न ह्मणे अवतार । भगवंताचे ॥४॥ -दासबोध-- दुधाने भरलेल्या हौदांत एक विषबिंदु सांडावा; दारूने भरलेल्या कोठारांत एक ठिणगी पडावी; धेनूंच्या खिल्लारांत एखादा व्याघ्र शिरावा; म्हणजे जसा त्यांचा सत्यनाश होतो, त्याप्रमाणेच ऐहिक सुखामध्ये व वैभवामध्ये मृत्यु घुसल्यामुळे त्यांचाही सत्यनाश उडाला आहे. मृत्यूइतके भयंकर दुसरे कोण आहे ? मृत्यूपेक्षा अधिक मोठा घात तो कोणता ? इहलोक नष्ट होण्याइतकी दुसरी हानी ती कोणती ? मृत्यूची अंधुक अंधुक मूर्ति जरी डोळ्यांसमोर उभी राहिली; अंतःकरणांत एकवार त्याचे यथातथ्य स्मरण जरी झाले; तरी तेवढ्याने केवढाही धैर्यवान् प्राणी असो; केवढाही शूर असो; केवढाही कर्तबगार असो; त्याचे हातपाय लटपटतात; त्याची उमेद खचून जाते; त्याच्या मनाची उडी जेथल्या तेथें मुरून जाते; त्याचे बेत थिजून जाऊन त्याच्या बर्फाप्रमाणे शिळा बनतात. त्याच्या विकसित बुद्धिमत्तेपुढें धुकेंच धुके पसरून दिशाभूल होते किती भयंकर स्वरूप हे ! कोणी कितीही स्वेच्छाचारी असोत; कोणी कितीही पाषाणहृदयी असोतः ह्या मृत्यूसारखा स्वैर व पाषाणहृदयी आजपर्यंत कोणी झाला नाही, व पुढे होणार ही पण नाही! राव असो की रंक असो; लहान असो की थोर असो; स्त्री असो की पुरुष असो; अशक्त असो की सशक्त असो; पंडित असो की मूढ असो; शूर असो की भित्रा असो; वैद्य असो की रोगी असो; बाल असो की वृद्ध असो; सुष्ट असो की दुष्ट असो; गृहस्थ असो की संन्याशी असो; जनांत असो की वनांत असो; गुहेंत असो की, राजवाड्यांत असो; सर्वांवर मृत्यूची झडप सारखीच! त्याचे पाश पाहिजे तेथे पाहिजे त्या वेळी, पाहिजे त्याचा गळा गोंवावयास तयार असतात ! मृत्यूला काल नाही वेळ नाहीं; शुभ नाही, अशुभ नाहीं; अमावास्या नाहीं व्यतिपात नाहीं; हा सदासर्वदा तयारच : त्याला गोहत्या नाहीं ब्रम्हहत्या नाहीं; स्त्रीहत्या नाहीं बालहत्या नाही; त्याला पाप नाही त्याला पुण्य नाहीं; त्याला विधि नाहीं निषेध नाहीं; त्याला विचार नाहीं अविचार नाही; ही स्वारी केव्हां, कशी, कोठे व कोणापुढे दत्त करून उभी राहील ह्याचा नेम नाही. तात्पर्य, प्राणी जन्मास आला-त्याने शरीर धारण केलें-की त्यास ह्या भयंकर काळाच्या दाटेंत आज ना उद्यां केव्हां तरी शिरलें हैं पाहिजेच. तें ब्रह्मदेवास सुद्धां टळणे नाही. म्हणूनच आमच्या कविकुलगुरूने म्हटले आहे “मरणं प्रकृतिः शरीरिणाम्" व श्रीज्ञानेश्वर महाराजांनी “जन्माच्या रूपाने मृत्यूच ह्या लोकी अवतार घेऊन आला आहे" असे उद्गार काढले आहेत. हे जरी सर्व सत्य आहे; मृत्यु जरी इतका अपरिहार्य व इतका भयंकर आहे, तरी भयंकर कोणाला ? ज्यांच्या वर तो प्रसंग येत नाही, त्यांना किवा ज कर्तव्यपराङ्मुख होतात त्यांना. परंतु जे कोणी आपले कर्तव्य उत्तम रीतीनें बजावून कृतकृत्य होतात, स्वधर्मनीति पाळून जे कोणी आपल्या जीविताचे सार्थक करतात; आपण कोण ? आलों कोठून ? कतेव्य काय ? जावयाचे कोठे? ह्यांची ज्यांच्या अंतःकरणास पुरी