या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १९०१. ओळख पटते, त्यांना मृत्यु हा मुळीच भयंकर नाही. येवढेच नव्हे, तर तो आनंदाची खाणः सुखाचे सर्वस्व; शांतीचें स्थान; व विश्रांतीचे मंदिरच होऊन राहतो. मृत्यूच रूपांतर स्वर्गारोहणांत होते. अशाच परम भाग्यवंत मनुष्यांच्या-नव्हे देवाच्या-इश्वरा अंशाच्या-कोटीपैकीच आमच्या श्रीमती चक्रवर्तिनी विजयिनी महद्भाग्यशालि नीमहाराणी देवी व्हिक्टोरिया ह्या होत्या. त्या ता० २२ जानेवारी सन १९०१ राज मंगळवारी रात्रौ ७ वाजता स्वर्गवासी झाल्या!!! आणि त्यांच्या वियोगजन्य शोकसागरामध्य सारे जग गटकळ्या खात राहिले आहे. आली तर बोलून चालून भारतीय! तिच्या कृपाछत्राखालची प्रजा! तिची सख्खी लेकरें! ती आमची खरी माता; आमच्या सुवणभूमीची चक्रवर्तिनी; आमच्या देशांतील सर्व मांडलिकांनी तिजपटें लीन व्हावें, येवढा तिची थोरवी व प्रताप. इ० स० १८५८ पासून आज चाळीस बेचाळीस वर्षे तिन आमचे पालनपोषण केलें; आमच्या केसासही धका लागू नये ह्मणून तिने खडा पहारा ठेवला; आमचे दुःख ऐकून जिच्या आंतड्यांस पीळ पडे; आमची राजनिष्ठा व पूज्यबुद्धि पाइन जी वेळोवेळां संतोष प्रदर्शित करी; आमची बुद्धिमत्ता व कर्तबगारी पाहून जाश्रय राज्याधिकार अर्पण करी; आमची दुष्काळप्लेगादि संकटें पाहून जिच्या नेत्रांतून खळखळ खळखळ अश्रुधारा येत. अशी ती आमची जननी जरी साता समुद्रांपलीकडे होती, तरी ती आमच्या सन्निधच असल्याप्रमाणे वाटे व तिलाही आपली लेंकरें आपल्या जवळ असल्याप्रमाणे वाटत असे. ती आमची माता आह्मां सर्वास सोडून परलोकी जावीना। हाय हाय !! आमच्यांतील न्यायमूर्ति रानडे हे नररत्न अकस्मात् हारपून त्यांच्या विरहानीत आमचे लोक घायाळ झाले आहेत-त्यांस पुरता एक आठवडाही लोटला नाही-तोच महाराणीसाहेबांची प्रकृति अत्यावस्थ स्थितीत असल्याचे वर्तमान आले. त्याबराबर सारा देश हवालदील होऊन, त्यांस आरोग्य देण्याबद्दल ठिकठिकाणी ईश्वरी प्रार्थना व अनुष्ठाने सुरू झाली. परंतु जगदीशाने कोणत्याच गोष्टीकडे लक्ष्य न देता आमच्या दयाळू महाराणीसाहेबांस आपल्या सन्निध नेलें !! हे वर्तमान येऊन धडकतांच काय दशा विचारावी? सर्वांच्या अंतःकरणांस एकदम धका बसला. ध्यानी मनी नसतां आकाश कडकडून ज्याप्रमाणे विद्युत्पात व्हावा, त्याप्रमाणे दाही दिशा शून्य झाल्या! चित्तवृत्ति तटस्थ झाली. कांसव ज्याप्रमाणे आपले हातपाय आवरून घेते, त्याप्रमाण मनाल व्यापार एकदम बंद पडले. कंठ सदादित होऊन अश्रृंनी नेत्र भरून आले . खर झटल तर आमच्या देशांतील लोकांस त्या साध्वीचें, चित्रांत, नाण्यावर काय दर्शन झाले असेल तेवढेच प्रत्यक्ष दर्शनाचा योग, हातांच्या बोटांइतक्या लोकांस तरी आला असेल का नसेल ह्याचा वानवा. प्राकृत रयतेस राणी सरकार' ह्या नावाशिवाय त्यांच्या विषयी फारच थोडी माहिती होती. पण ते तिचे मधुर नामच आह्मां लोकांस इतकें प्रिय व गोड वाटे की, अशा प्रकारचे अडाणी लोक सुद्धां ढळढळां रडले! प्रस्तुत मन्वंतरांत हाच मोठा अद्भुत चमत्कार ध्यानात ठेवण्यासारखा आहे. मग तमाम वर्तमानपत्र, मासिक पुस्तकें, सभा वगैरे जनलोकांचा शोक केवळ गगनमंडळास भेदून गेल्याप्रमाणे झाला