या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. हैं काय सांगितले पाहिजे? अशा प्रकारे ह्या दुःखदायक बातमीनें जिकडे तिकडे हाहाकार उडून राहिला आहे. ह्यास्तव सर्वांबरोबर जनरीतीप्रमाणे आह्मीही त्या देवीचे थोडेसें चरित्र देऊन व गुणानुवाद गाऊन दुःखाचे भागीदार होत आहोत. महाराणीसाहेबांचा जन्म ता० २४ मे इ० स० १८१९ रोजी झाला. व त्यांचे नांव 'व्हिक्योरिया-विजयिनी-असें ठेवले. त्यांच्या वडिलांचे नांव ड्यूक ऑफ केंट असें होतेंह्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे वडील लौकरच निवर्तले. तेव्हां त्यांच्या मातुश्रीने त्यांचा प्रतिपाळ केला. इतकेच नव्हे, तर त्यांस अगदी पहिल्या प्रतीचे शिक्षण देऊन नीतीची केवळ मूर्तिच वनविली ! महाराणीसाहेबांचे अजोळ जर्मनींत होते. तथापि आपल्या अपत्यांचा जन्म इंग्लडांत व्हावा असा हेतु असल्यामुळे त्यांचे वडील इंग्लंडास येऊन राहिले होते. ह्या वेळी खरें मटलें मणजे व्हिक्टोरिया ह्या इंग्लंडाच्या राणी होण्याचा फारसा संभव नव्हता. तरी ते बालक इतकें मनमोहक, इतके सुकुमार व इतके राजबिंडे दिसे की, त्यांचे वडील आपल्या कन्येला अगदी लहान असतांच प्रेमाने उचलून घेऊन आपल्या स्नेही सुहृदांस ह्मणत की "पहा पहा हो, ही किती सुलक्षण दिसते आहे ती! माझा तर असा सूर वाहतो की, ही कधी तरी इंग्लंडची राणी होणार !” हे त्यांनी कशावरून अनुमान केले होते, ते समजण्यास मार्ग नाही. परंतु तो त्यांचा मंगल आशीर्वाद किती व कसा फलद्रूप झाला, हे सांगण्याची आजमितीला तादृश आवश्यकता नाही. त्या वेळी इग्लडच्या गादीवर महाराणी व्हिक्टोरिया ह्यांचे चुलते चवथे वुइल्यम हे राजे होते. व त्यांस कांहीं संतति नव्हती. आणि जवळचे दुसरे वारसही हळू हळू अस्तंगत होत चालले होते. ह्यामुळे महाराणींच्या मातुश्रीस व इष्ट आप्तांस उत्तरोत्तर ह्या इंग्लडच्या महाराणी होतील असा संभव दिसू लागला. तथापि ही गोष्ट व्हिक्टोरिया हीस कळली तर, न जाणों त्यांस अभिमान उत्पन्न होऊन त्या तोऱ्याने किंवा ताठ्याने वागू लागतील. अशा समजुतीवर ती गोष्ट त्यांच्या कानावर मुळीच जाऊं नये याबद्दल फार फार खबरदारी घेण्यांत आली होती. शिवाय, त्या कालच्या इंग्लडच्या राजांची व दरबारची नीति, त्याच्या मातुश्रींस मुळीच आवडत नसे. ह्यास्तव त्या दरबारापासून फारच अलग रहात, व आपल्या कन्येसही त्याबद्दल कांहीं एक कळवीत नसत. तथापि त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाची अतिशय काळजी घेतली होती. प्रत्येक विषयावर एक एक विदुषी मास्तरीण ठेवलेली असे. शिवाय चित्रे काढावयास शिकविण्यासाठी, एक नामांकित चितारी ठेवला होता. व्हिक्टोरिया प्रथमपासूनच तीव्र बुद्धीच्या होत्या. अकराव्या वर्षीच त्यांस ग्रीक, ल्याटिन व इंग्लिश, ह्या तीनही भाषा उत्तम येत असून शिवाय इटा. लियन भाषाही बरीच अवगत होती. त्या वयाने इतक्या लहान होत्या तरी, त्यांचे वर्तन, भाषण वगैरे फारच पोक्त असल्यामुळे त्यांच्या मातेस व शिक्षकिणींस फार समाधान होत असे. शेवटी आपण इंग्लंडची महाराणी होण्याचा संभव आहे, ही गोष्ट त्यांच्या आतां कानावर घालण्यास हरकत नाही, असे सर्वांनी ठरवून त्यांनी त्या कामावर एका मास्तरिणीची योजना केली. तेव्हा तिने व्हिक्टोरिया ह्यांच्या वाचनाच्या पुस्तकांत इंग्लं