या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १९०१. डच्या राजांचा वंशवृक्ष घातला; व तो त्यांस समजून दिला. व कदाचित् दैवयोगानें आपणांसही तें राज्यपद मिळण्याचा संभव आहे असेंही दिग्दर्शन केले. तेव्हां ती गोष्ट, त्या देलबुद्धि राजकुमारीच्या तेव्हांच लक्ष्यांत येऊन चुकली. पण त्यांच्या वृत्तींत यत्किंचितही पालट झाला नाही. त्या ह्मणाल्या " असे काय? मला इतके झटून शिक्षण कां देतात, त्याचे कारण आतां माझ्या लक्ष्यांत आलें. पद मोठे आहे खरे, पण त्यामुळे येणारी जबाबदारी त्याहूनही मोठी आहे. ह्याकरितां मी होईल तितके चांगले वागावयास शिकणार." ह्याप्रमाणे भावी महाराणीचा अभ्यासक्रम व शिक्षणपद्धति चालू असतां, इंग्लडच्या गादीवर असलेल्या त्यांच्या चुलत्यास-ह्मणजे चवथ्या वुल्यम राजास-ता० २० जून सन |१८३७ रोजी रात्री दोन वाजतां देवाज्ञा झाली. तेव्हां कांटरबरीचे आर्चबिशप व लार्ड चिंबरलेन हे उभयतां व्हिक्टोरिया रहात होत्या त्या राजवाड्यांत गेले. तो पहांटे पांच वाजण्याचा सुमार झाला होता. तरी दासींनी सांगितले की, राजकन्या इतकी गाढ नि| देंत आहे की, आमच्याने तीस उठवत नाही. परंतु ते ह्मणाले आह्मी इतक्या महत्वाच्या | राजकीय कामासाठी आलो आहों की, त्यांची आजचा दिवस झोपमोड झाली तरी हरकत नाही. हे भाषण त्यांच्या मातुश्रींच्या कानी पडले, तेव्हां त्यांनी आंत जाऊन व्हिक्टोरियास जागे केले व त्या तशाच रात्रीच्या पोषाखाने बाहेर आल्या, व सर्व वर्तमान सम. जल्यावर त्या फार फार कष्टी झाल्या, व तत्काल त्यांनी परमेश्वराची प्रार्थना करून अकरा वाजतां कौंसिल भरविण्यास हुकूम दिला. व पूर्वीच्या राणीस-अर्थात् आपल्या चुलतीसदुखवट्याचे पत्र लिहिण्यास सुरवात केली. आणि प्रथमच “इंग्लडच्या महाराणीसाहेब-" असा मायना लिहिला. त्या वेळी त्यांच्या जवळ एक बाई उभी होती, तिने विनंति केली की, “ राणीसाहेब ! आतां इंग्लडच्या महाराणी आपण खुद्द आहात. त्या नाहीत." त्यावर त्या कोमल अंतःकरणाच्या राजकन्येने उत्तर दिले “होय; खरे आहे. परंतु ही गोष्ट त्यांच्या कानावर मी घालावयाची नव्हे." असें ह्मणून त्यांनी त्याच मायन्यांत ते दुखवव्याचे पत्र पुरे करून आपल्या काकीकडे-इंग्लंडच्या माजी महाराणीकडे रवाना केलें. पुढे लौकरच त्यांस रीतीप्रमाणे राज्याभिषेक होऊन त्या इंग्लंड देशाच्या स्वामिनी झाल्या. महाराणीसाहेब त्या वेळी केवळ १९ वर्षांच्या होत्या. तथापि त्यांचे उच्च शिक्षण, त्यांचे यथायोग्य व पोक्त वर्तन, शांत वृत्ति, व विचारी स्वभाव इत्यादि त्यांच्या अमोल गुणांनीच त्या इंग्लंडास अत्यंत प्रिय झाल्या. ऐरिश लोक मटले ह्मणजे प्रथमपासूनच स्वातंत्र्यप्रिय. ते राजाच्या नांवानें सदासर्वदा खडे फोडित राहणारे! पण ते लोक सद्धां महाराणीस पाहून सुप्रसन्न झाले. तथापि मनुष्य कितीही सुजन असो; कितीही कोमल व निरुपद्रवी असो; त्याच्या उलट शत्रुत्व करणारी ह्मणा किंवा पाण्यांत पहाणारी ह्मणा-मंडळी ही असावयाचीच. त्याप्रमाणे तेथेही महाराणीच्या विरुद्ध मंडळी होतीच. त्यांपैकी कांही मूर्ख लोकांनी डयूक ऑफ कंबरलंडला गादी द्यावी, ही लहान राणी काही कामाची नाही, असाही बूट काढला होता. पण त्यांच्यापुढे ऐरिश लोकांचे प्रमुख ड्यानियल ओ. | कोनेल आवेशाने ओरडून ह्मणाले “ आमच्या ह्या महाराणीविरुद्ध कोणी तोंडांतून अ