या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. काढील तर मी ५००००० शूर योद्धे तयार करीन. पण त्यांच्या एका केसास सुद्धा धका लागू देणार नाही.” असे ऐरिश लोकांकडून उद्गार निघणे झणजे किती विलक्षण आहे, हे लक्ष्यांत येईलच. आणि त्यावरून महाराणीसाहेबांची सद्दी पहिल्यापासूनच कशी धुरंधर होती, ह्याची कल्पना सहज होण्यासारखी आहे. याला सा 1 महाराणीसाहेब सिंहासनारूढ झाल्यानंतर पार्लमेंट सभेने त्यांना नेमणूक करून दिली. ती अशी:६०,००० पौंड हातखर्चीकडे. NETRIOR १,७२,५०० पौंड खानगी खर्चाकडे. १,३१,१६० पौंड नोकरलोकांच्या पगारासाठी. CIRRIER IRRIER Pip १३,२०० पोंड धर्मादायासाठी. simar ३,७६,८६० एकूण पौंड. शि .initions व्हिक्टोरिया महाराणीसाहेब येवढ्या मोठ्या देशाच्या स्वामिनी झाल्या तरी त्यांच्या चि. त्तवृत्तींत यत्किंचितही बदल झाला नाही, किंवा त्यांच्या मनाला अभिमानाचा विटाळही लागला नाही. आपली नेमणूक वाढली, आपण वैभवशाली झालों, ह्मणून त्यांनी आपला ऐषआरामही फारसा वाढविला नाही. त्यांचा स्वभाव फार काटकसरी असे. त्या आपला खर्च आपल्या नेमणुकीत भागवीत, येवढेच नव्हे, तर प्रत्येक वर्षी त्यांतून सुमारे ८०,००० पौंड शिल्लक पाडित. आणि त्यांतून पुष्कळसा आणखी दानधर्म करीत. अतसमयीं त्यांची खासगी शिल्लक एक लक्ष पौंड असावी, असा अदमास आहे ! प्रत्येक मुलाच्या नेमणुका पृथक् असत, व त्यांचे लग्न झाले झणजे त्या प्रत्येकास ४००० पौंड अधिक मिळत. राणीसाहेब वयाने लहान असतांही सिंहासनावर बसतांना त्यांनी दाखविलेला पोक्तपणा, शांत वृत्ति, निरालसता, इत्यादि अनेक सद्गुण पाहून सर्व प्रजाजनांची त्यांच्यावर तेव्हांच प्रीति जडली. पुढे लौकरच महाराणीसाहेबांस वाढू लागले की, एकट्याच अनुभवशून्य मुलीने येवढ्या अफाट राज्याचा राज्यभार वाहण्यापेक्षां, कोणी तरी सुज्ञ जिवलग पुरुष आपल्या साह्यास असावा. म्हणून त्यांनी लग्नाचा विचार मनांत आणिला. जर्मनीमध्ये त्यांचा एक मामेभाऊ ' प्रिन्स ऑलबर्ट ' ह्या नांवाचा राजपुत्र होता. त्यांच्यावर महाराणीसाहेबांचे प्रथमपासूनच फार प्रेम होते; व त्यांच्या विद्येला व सद्गुणांला त्या चांगल्या ओळखून होत्या. त्या परस्परांत प्रेमाचा पत्रव्यवहारही होत असे. त्याबद्दलची सविस्तर हकीगत व ती पत्रे केरळकोकिळांत पूर्वी प्रिन्स ऑलबर्ट ह्यांच्या चरित्रांत येऊन गेलीच आहेत. तेव्हा त्यांनी आपला बेत त्यांस कळवून सन्मानाने इंग्लंडास बोलावून आणले. प्रिन्स ऑलबर्ट ह्यांच्या इष्ट आप्तांस व महाराणीसाहेब ह्यांच्याही इष्ट आप्तांस हे लग्न जुळून यावें असेंच वाटत असे; व त्याप्रमाणे घरगुती नात्याने सर्व बोलणी चालणी होऊन विवाहाचा निश्चय झाला; व तो महाराणीसाहेबांनी स्पष्टपणे पार्लमेंट सभेलाही कळविला, व तेथें तो सर्वानुमत कायमहा करण्यात आला. प्रिन्स ऑलबर्ट ह्यांचे वय, महाराणीच्या वयाच्या अगदी