या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १९०१. जवळ जवळच होते. हा विवाहसमारंभ ता० १० मे सन १८४० रोजी पार पडला. (बिन्स ऑलबर्ट हे शास्त्रे व कला ह्यांत फारच प्रवीण होते. त्यांचा स्वभाव फार थार व अन्यंत मनमिळाऊ होता. त्यांस पार्लमेंट सभेने ८०,००० पौंडांची नेमणूक करून दऊन 'ग्रिन्स कन्सार्ट' हा किताब दिला; व त्यांचा मान 'दुय्यम '-ह्मणजे महाराणीच्या खा लोखाल-मणून ठरविलें. कोणतेही कृत्य असो, त्यांत दुफळी ही असावयाचीच. ह्या निबमाप्रमाणे कितीएकांस हा विवाहही आवडला नाही. ते लोक प्रिन्स ऑलबर्ट ह्यांचा प. हिल्या पहिल्याने फार द्वेष करीत. परंतु पुढे पुढे प्रिन्स ऑलबर्ट ह्यांचा चतुरस्रपणा, थोर विगंभीर स्वभाव, सर्वांशी समतोलपणाने वागण्याची हातोटी, इत्यादि त्यांचे गुण जसजस उदयास येऊ लागले, तसतसें हें वावटळ थंड पडून अखेरीस शांतता झाली. प्रिन्स ऑलबर्ट हे मोठे थोर व दिलदार राजपुत्र होते; व त्या गुणांची ह्या देपत्यात जणों काय चढाओढच लागली आहे असे वाटे. परंतु प्रत्येक खेपेस महाराणीसाहेबांचीच कडी त्यांच्यावर चढे. प्रथम प्रिन्स ऑलबर्ट जर्मनींतून येऊन लग्नाची बोलणी चालणी मुरू झाली तेव्हां, त्यांच्या व त्यांच्या मित्रमंडळींच्या मनांत एक मोठा संशय उभा राहिला. तो हा की, व्हिक्टोरिया ह्या महाराणी आहेत; व प्रिन्स ऑलबर्ट कितीही थोर झाले तरी, त्यांच्या प्रजेपैकीच एक, तेव्हां त्या आपल्या पतीच्या आज्ञेत वागतील किंवा कसें । नाहीं तर पदोपदी अपमान होऊन जीव नको झणण्याची पाळी यावयाची. पण तुझी पताच्या आज्ञेत वागले पाहिजे, ही गोष्ट महाराणीसाहेबांस विचारावी तरी कोणी ? ह्याही सर्वास संकटच पडले. ह्या संशयांतच देवालयामध्ये लग्नविधि सुरू झाला. परंतु कर्मधर्मसंयोगाने त्या शंकेचें लगविधीपूर्वीच निरसन झाले. तें असें:-देवालयांतील धर्माधिकारी किंवा उपाध्याय जेव्हां लग्नांतील मंत्र ह्मणूं लागला तेव्हां-ख्रिस्ती धमीतही-आमच्यातील लग्नविधीप्रमाणेच 'धर्मे च; अर्थे च;" अशी नवरानवरींनी ह्मणावयाची काही वाक्ये आहेत. व्यांत 'मी तुमच्या आज्ञेत राहीन' असें एक पत्नीने पतीशी करार करण्याचे वाक्य आहे. त्याचा त्यासही संशय येऊन त्याने महाराणीसाहेबांस विनंती केली की, " हे वाक्य गाळून टाकू की काय ? " त्यावर महाराणीसाहेबांनी तत्काल उत्तर दिले “मी लग्न करते आहे, तें महाराणी ह्या नात्याने करीत नाही. तर स्त्रीधर्म या नात्याने करित आहे. ह्याकरिता मी स्त्रीधर्माप्रमाणे आपल्या पतीच्या आज्ञेत वागेन. ह्यास्तव तें वाक्य वगळण्याचे कारण नाही.” हा गंभीर व पोक्त विचार ऐकून तेथील जमलेल्या मंडळींच्या मनांत त्यांच्या विषयी अतिशयच पूज्य भाव उत्पन्न झाला, व आनंदाने विवाह पार पडला. हे पतीस दिलेले वचन महाराणींनी शेवटपर्यंत पाळलें-झणजे त्या पतीच्या आज्ञेत वागल्या. त्या येवव्या थोर व श्रेष्ठ पदावर होत्या तरी त्यांनी त्यांची कधीच अवज्ञा केली नाही. त्या परस्परांत अत्यंत प्रेम असे. परस्परांचा परस्परांस यत्किंचितही वियोग सहन होत नसे. एके दिवशीं प्रिन्स ऑलबर्ट काही कारणावरून राणीसाहेबांवर थोडेसे रुसले, आणि आ पल्या खोलीत जाऊन दार बंद करून बसले.. मागाहून राणीसाहेब गेल्या आणि दारावर धक्का देऊन सविनयपणे ह्मणाल्या “ दार उघडावें.” तेव्हां ऑलबर्ट साहेबांनी आतून