या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. मुद्दामच प्रश्न केला की " कोण आहे ? " ह्या प्रश्नांत फार खुबी होती. ती जाणून रा. णीसाहेब तत्काल ह्मणाल्या “ महाराणी नाहीं; आपली सखी-दासी व्हिक्टोरिया आहे." हे ऐकून प्रेमानें ऑलबर्ट साहेबांचा कंठ भरून आला, आणि त्यांनी चटकर दार उघड्न त्यांनी आपल्या अर्धांगीच्या हातात हात घातला! किती थोर स्वभाव हा ! ह्या आपल्या गुणवंत पतीबरोबर राणीसाहेबांनी २१ वर्षे संसाराच्या अनुपम सुखाचा अनुभव घेतला. व राज्यकार्यात सुद्धा त्यांच्या प्रियकर पतीने त्यांस एखाद्या बुद्धिवान् राज्यकार्यधुरंधर व चतुरस्र मंत्र्याप्रमाणे आमरण साह्य केलें. प्रिन्स ऑलबर्ट हे मोठे वक्ते होते. त्यांनी इंग्लंडामध्ये प्रथमच गुलामांच्या मुक्ततेची आवश्यकता' ह्या विषयावर व्याख्यान दिले. कारण, तोच त्यांचा आवडता विषय होता. ह्मणून त्यांनी त्यासाठी आमरण अश्रांत श्रम केले, व त्यांत त्यांस उत्तम प्रकारे यशही पण आले. ह्याशिवाय, त्यांस कलाकौशल्याचाही फार नाद असे. ह्यास्तव त्यांनी फार प. रिश्रमाने इ. स. १८५१ मध्ये एक मोठे जंगी प्रदर्शन केले. त्यांत त्यांची फार वाहवा झाली. नंतर दुसऱ्या प्रदर्शनाच्या कामांत ते गुंतले असतां ता० १४ डिसेंबर सन १८६१ ह्या दिवशी त्यांस देवाज्ञा झाली ! त्यामुळे महाराणीसाहेबांच्या दुःखास पारावारच नाहीसा झाला!! किंबहुना त्यांच्या दुःखाचा तो भयंकर धक्काच त्यांस शेवटपर्यंत पुरला झटले तरी चालेल. त्यानंतर कोणत्याही आनंदोत्सवांत किंवा समारंभांत बाहेर जाण्याचे मान त्यांनी पुष्कळच अंशानें कमी करून सोडले. लग्न झाल्यापासून त्या नेहेमी उपहारास व भोजनास आपल्या पतीबरोबर बसत असत. परंतु पुढें दुर्दैवाने त्यांस एकटेंच बसण्याचा प्रसंग आला. त्यांचे कोमल व सकुमार अंतःकरण दुःखाने इतकें करपून गेले होते तरी, त्यानी सरकारी कामांत कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी आपल्या पतीच्या पश्चात् जे मोठे स्मारक उभारून त्यावर जो हृदयद्रावक लेख लिहून ठेवला आहे, त्यावरून त्यांची पतिनिष्ठा व निस्सीम प्रेम दिसून येते. त्यांच्या बसावयाच्या जाग्याशेजारीच एका दवालयांत त्यांनी आपल्या पतीचे स्मारक बांधन त्यावर खाली लिहिल्याप्रमाणे लेख लिहून ठेवला आहे: "राज्ञीपति फ्यान्सिस ऑलबर्ट चार्लस ऑगस्टस इम्यान्युएल ह्यांच्या प्रेममय स्मरणार्थ हे स्मारक, या देवळांत त्यांच्या ठिकाणी सतत निष्ठा ठेवणारी व शोकदग्ध अशी त्यांची विधवा महाराणी व्हिक्टोरिया हिने इ. स. १८६४ साली उभारले. मरणसमयीं त्यांचे वय ४३ वर्षांचे होते. ते ता० १४ मे इ. स. १८६१ या दिवशी निवर्तले !" tml " मरणपर्यंत तूं एकनिष्ठेनें रहा. ह्मणजे मी तुला जीवितमुकुट देईन." ह्या लेखावरून महाराणीसाहेबांची पतिनिष्ठा किती लोकोत्तर होती, ह्याची उत्तम प्रकारे साक्ष पटते. महाराणीसाहेबांस एकंदर नऊ मुले झाली. ४ पुत्र आणि पांच कन्याः१ कन्या-प्रिन्सेस व्हिक्टोरिया-जन्म ता. २१ नोवेंबर स. १८४०. ह्यांचे चिरंजीव हेच जर्मनीचे हल्लींचे बादशहा होत. त्यांचे पति निवर्तल्यापासून त्या फार करून मातुश्रीकडेच असत,