या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. होईल. सारे परमाणू एकाच दिशेने जाऊं लागणे हीच विद्युत् किंवा विद्युच्छक्ति होय. एका खोलीतील हवेचे सारे परमाणू जर एकाच दिशेने जातील असें केले, तर तीच त्या खोलीतील विद्युत्ची एक प्रचंड ब्याटरी होईल. शारीरशास्त्रांतील आणखी एक मुद्दा आमांस ध्यानांत ठेवला पाहिजे. तो हा की, श्वासोच्छासक्रिया नियमित चालविणारे जे चक्र, त्याच्या अंगी ज्ञानरसप्रवाहाच्या व्यवस्थेवर अंमल चालविण्याजोगी थोडीशी शक्ति असते. आणखी, हे श्वासोच्छासावर सत्ता चालविणारें चक्र, छातीच्या समोरीने पाठीच्या कण्यामध्ये असते. तें चक्र श्वासोच्छास इंद्रियांना व्यवस्थित रीतीने चालवून शिवाय इतर त्याच्या खालच्या चक्रांवरही थोडीशी सत्ता चालविण्याचा प्रयत्न करते. rajणETणायगडाआ T ह्यावरून श्वासोच्छासाचा-प्राणायामाचा अभ्यास का करावा तें आपल्या लक्ष्यांत येईल. प्रथमदर्शनी, नियमबद्ध श्वासोच्छ्रासाच्या योगाने शरीरांतील दरोबस्त परमाणूंची प्रवृत्ति एका दिशेकडे होते. मन जेव्हां इच्छारूप बनते, तेव्हां ज्ञानप्रवाहासही विद्युच्छक्तीप्रमाणे एक शक्ति प्राप्त होते. कारण, विद्यत्प्रवाहाच्या क्रियेनें ज्ञानतंतूंना ध्रुवोत्सारक गति प्राप्त होत असल्याचे सिद्ध झाले आहे. ह्यावरून दिसून येते की, इच्छाच जेव्हां ज्ञानतंतरूप बनते, तेव्हां तिला काही अंशी विद्युत्स्वरूप येते. शरीरातील सर्व शक्ति नियमसूद झाल्या, ह्मणजे शरीर हे जणों काय इच्छेची एक मोठी जबरदस्त-ब्याटरी-खजिनाच बनून राहते. ही जबर इच्छा हीच काय ती योग्याला मुख्य हवी असते. ह्मणून प्राणायामाच्या अभ्यासाचा प्राणिधर्मशास्त्राप्रमाणेही ह्यांतच उलगडा झाला. त्याच्या योगाने शरीरांतील सर्व क्रिया नियमसूद चालतात; आणि श्वासोच्छासचक्रांकडून इतर चक्रांवर सत्ता चालविण्याच्या कामींही मदत होते. प्राणायामाचा मुख्य उद्देश, मलाधार चक्रांतील कुंडलिनी नामक शक्ति, जी वेटाळे घालून बसलेली असते, ती जागृत करणे हा होय. जामोर जो प्रत्येक गोष्ट जी आमी पहातों: किंवा जिची आह्मी कल्पना करतों; किंवा जी स्वप्नांत आपल्या दृष्टीस पडते; तिला पहावयाला आमच्यापाशीं एक स्थान असले पाहिजे. हे स्थान हेच नेहमींचे आकाश