या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १९०१. २ पुत्र-युवराज प्रिन्स ऑफ वेल्स-जन्म ता. ९ नोवेंबर स. १८४१. हेच सांप्रत इंग्लं डचे सातवे एडवर्ड राजे व हिंदुस्थानचे बादशहा झाले आहेत. ३ कन्या-मेरी-........."ही इ. स. १८७८ साली मयत झाली. ४ पुत्र-ड्यूक ऑफ एडिंबरो-जन्म. इ.स. १८४४-मृत्यु ता० ३१ जुलै इ. स.१९००. ५] कन्या २-प्रिन्सेस हेलेना १८४६ त जन्मली. ६) , १८४९ , ७ पत्र-ख्यक ऑफ कॅनाट-जन्म-इ० स०१८५०.PUSPIRAUNTAIN ८ पुत्र-प्रिन्स लिओपोल्ड आल्बर्ट-ज. इ० स० १८५३-मृत्यू-१८८४. ९ कन्या-बियाट्रीस-जन्म इ० स० १८५७. ह्यांपैकी दोन पुत्र, एक कन्या, जामात इत्यादिक अल्प वयांतच निवर्तल्यामुळे, महारापीसाहेबांच्या पूर्वीच्या दुःखावर आणखी घाव पडल्याप्रमाणे झाले. परंतु त्या धैर्यशाली असल्यामुळे तें सर्व त्यांनी शांतपणाने सहन केले. किंवा त्या कुटुंबवत्सल असल्याने तसलेही प्रसंग सोसण्याची त्यांच्या आंगी हळू हळू शक्ति आली झटले तरी चालेल. आजमि. तीला त्यांचे मुलगे, मुली, नात, पणतू, सुना वगैरे मिळून कुटुंबांतील माणसें ९६ आहेत. महाराणीसाहेब इंग्लंडच्या गादीवर बसल्या त्या वेळी आपलें हिंदुस्थान त्यांच्या अमलाखाली नव्हते. ईस्ट इंडिया नांवाच्या कंपनीचा येथें अधिकार होता. परंतु सन १८५७ साली प्रचंड बंड उद्भवून हिंदुस्थानांत जेव्हां भयंकर रक्तपात झाला, तेव्हां ईस्टइंडिया कंपनीस आपल्या राज्यपद्धतींत कांही तरी चूक असावी असे वाटू लागले. ह्यास्तव तिनें ते राज्य पार्लमेंटसभेच्या अनुमताने इ. स. १८५८ मध्ये महाराणीसरकारच्या स्वाधीन केले. त्याचा स्वीकार करतांना महाराणीसरकारांनी जो मेहरबानीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला, तो मराठी पांचव्या पुस्तकांतून वगैरे प्रसिद्धच आहे. तेव्हापासून आज ४२ वर्षे त्या आमच्या भरतभूमीच्या व सुमारे ४० कोटि प्रजेच्या स्वामिनी होत्या. नंतर त्यांनी इ. स. १८७८ साली हिंदुस्थानच्या चक्रवर्तिनी किंवा बादशाहीण हा किताब धारण केला. व आजवर सर्व भरतभूमि व ब्रह्मदेश सुद्धा त्यांच्याच कृपाछत्राखाली सुखाने नांदत आहे. संतति, संपत्ति, भाग्य, वैभव, शांतता, लोकप्रियता व दीर्घायुष्य इत्यादि सर्व अनुकूलता या राणीइतकी इंग्लंडच्या आजपर्यंतच्या राजाराणींस तर काय, पण जगांतील कोणत्याही राजाराणींस प्राप्त झालेली उदाहरणे कचित्च आढळतील. महाराणीसाहेब यांनी ६४ वर्षे राज्य केलें, व ८२ व्या वर्षी इहलोक सोडला. ह्मणजे बहुतेक १९ वे शतक त्या एकट्या जगन्माउलीच्याच इतिहासाने भरलेलें आहे झटले तरी चालेल. येवढे भाग्य थोड्याच राजपुरुषांच्या वाट्यास येते. ह्यांच्या कारकीर्दीत ज्या गोष्टी घडून आल्या, त्या केवळ अ. श्रुतपूर्व आहेत. इंग्लंडच्या राष्ट्राचा विस्तार तर इतका वाढला आहे की, इंग्लिश लोक राणीच्या राज्यावरचा सूर्य कधींच मावळत नाही, ह्मणून अभिमान बाळगतात, आणि तो अगदी यथार्थ आहे. कारण, त्यांचे राज्य पृथ्वीवरील कोणत्याही गोलार्धात नाही असे