या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. नाहीच. ह्यामुळे हिंदुस्थानांतील राज्यावर सूर्यास्त झाला, तर अमेरिकेतील राष्ट्रांवर सूर्योदय होतो. ४०००००००० लोकांवर व पृथ्वीच्या भागावर त्यांचे स्वामित्व होते! ही गोष्ट फक्त एका राज्यविस्ताराविषयी झाली. परंतु त्याशिवाय त्यांच्या कारकीर्दीत ज्या काही हजारों महत्वाच्या, फायद्याच्या, व अश्रुतपूर्व गोष्टी घडून आल्या आहेत, त्या तर असंख्यात आहेत मटले तरी चिंता नाही. पैकी नवीन शोध हे एक होत. आगगाडी; तारायंत्र; फोटोग्राफी; एक्स्रेजने मनुष्यदेहांतील अस्थिपंजराचे प्रतिबिंब उठविण्याची विद्या; इत्यादि लक्षावधि शोध; आरमारांची सुधारणा; वगैरे होऊन व्यापाराची अतोनात वृद्धि झाली आहे. ग्रंथ, मासिक पुस्तकें, वर्तमानपत्रे, वगैरेंचा जिकडे तिकडे फैलाव होऊन ज्ञानाची वृद्धि झाली. इतकेच नव्हे, तर दंगेधोपे नाहीसे होऊन शांततासुखाचा अनुभव ह्यांच्या कारकीर्दीत जसा आला, तसा इतर राजाराणींच्या तर काय, पण बादशहाच्या अमलांत सुद्धां येणें केवळ दुरापास्त होय. ह्यावरून महाराणीसाहेबांची सद्दी व छाप कशी होती ह्याची कल्पना सहज करता येते. ही सर्व छाप वसण्याचे कारण, त्यांचे खासगी वर्तन, सच्छील स्वभाव, दया अंतःकरण, निरभिमानपणा, इत्यादि सद्गुण होत. त्यांच्या राजकीय चातुर्याचा किंवा कर्तबगारीचा कित्ता फक्त राजपुरुषांना व राजस्त्रियांनाच वळविण्यास उपयोगी पडेल. परंतु त्यांच्या खासगी वर्तनाचा बोध प्रत्येक मनुष्यामध्ये पूज्य बुद्धि जागृत करण्यासारखा व कित्ता उचलण्यासारखा आहे. त्यांच्या श्रेष्ठ गुणांतील प्रधान गुणांमध्ये उद्योगशीलता हा पहिला होय. कोणी कितीही जबरा उद्योग करणारा असो; महाराणीसाहेबांची उद्योगशीलता ऐकून तर त्याची सुद्धा छाती दडपल्यावांचून राहणार नाही. रात्रीच्या झोंपेशिवाय त्यांस कोणी कधीही रिकाम्या बसलेल्या पाहिलेल्या नाहीत. केव्हाही पहा! काहीना काहीतरी त्यांचा उद्योग हा चालू असावयाचाच. प्रतिवर्षास कमीत कमी ५०००० सरकारी कागदांवर सह्या व शिके त्यांस करावे लागत. परंतु कोणताही कागद स्वतः वा. चल्याखेरीज व त्यावर पूर्ण विचार केल्याखेरीज त्याच्यावर शिक्कामोर्तब किंवा सही कधीही करीत नसत. त्यांचा खासगी पत्रव्यवहार झणजे तर एक मोठे जंगीच प्रकरण होत. द. शोदेशींच्या इष्ट आप्तांकडून व लहान लहान मुलांबाळांकडून त्यांस प्रत्येक दिवशी इतका पत्रं येत की, टेबलावर भाराच्या भारा जमे. पण तितकी त्या स्वतः वाचून त्याचा उत्तरही त्या स्वतः लिहीत. आणि तीसुद्धा संक्षिप्त नव्हत; तर त्यांत लांबलचक मनोरजक हकीगत व मोल्यवान् बोध हा असावयाचाच. महाराणीसाहेबांच्या मुलाबाळांचा परिवार केवढा मोठा होता, तें पूर्वी सांगितलेच आहे. त्या प्रत्येकाचा त्या समाचार घेत. इतकंच नव्हे, तर प्रत्येक मुलाने समजू लागल्यापासन प्रत्येक दिवशी काय काय केले, त्याचा रिपोर्ट महाराणीसाहेबांकडे प्रति दिवशी पाठविला पाहिजे, अशी त्यांची सक्त आज्ञा अस. १ त्याप्रमाणे सारे रिपोर्ट प्रत्यहीं येऊन दाखल व्हावयाचे. व तितकें सारे त्या वाचून पाहून त्यांत कांहीं कमजास्ती वाटेल तें त्यांस स्वतः लिहून कळवीत. प्रत्येक मुलाचा व मुलीचा जन्मदिवस त्यांच्या अगदी बिनचूक स्मरणांत असे. दिवस उगवला की, आज कोणाचा