या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. लावणे, ओढून बाहेर काढणे, कारागृहांत कोंबणे,-नव्हे हाल हाल करून प्राण घेणे,-हीं इतिहासांतील अमानुष कृत्ये कोणीकडे ? त्यांचा धर्मादायाच्या कामांत तर हात नेहेमींच उदार असे. प्रत्येक संस्थेला त्यांची काहींना काहीतरी देणगी ही असावयाचीच. एक वेळ त्यांचे प्रियपति प्रिन्स ऑलवर्ट ह्यांच्या गाडीचे घोडे उधळून ते मोठ्या अपघातांतून वांचले. त्या आनंदोत्सवार्थ त्यांनी एक मोठी रक्कम देऊन तिच्या व्याजांतून प्रत्येक वर्षाच्या त्या दिवशी दानधर्म करण्याविषयींची त्यांनी व्यवस्था लावून दिली. ह्याप्रमाणे त्यांच्या हजारों रकमा प्रतिवर्षी नानाप्रकारच्या संस्थेकडे लागत. महाराणीसाहेबांस बालपणी प्रत्येक विषय शिकवावयास एक एक शिक्षक ठेवल्याचे पूर्वी सांगितलेच आहे. त्यांत एक उत्तम चितारी होता. पण त्याची अशी अट होती की, मी ह्या शिकविण्याबद्दल एक पै सुद्धा घेणार नाही. ह्याच अटीवर त्याने महाराणीसाहेबांस आपल्या कलेत प्रवीण केले. परंतु त्या बिचाऱ्यास पुढे पुढे अत्यंत दरिद्रावस्था प्राप्त झाली, व तीतच तो मरण पावला. मृ. त्यूपूर्वी त्याने एक महाराणीसाहेवांस पत्र लिहून त्यांत अशी विनंति केली होती की, माझ्या मागे माझी एक अनाथ व जन्मांध अशी बहीण आहे. ती निराधार असल्यामुळे तीस मी आपल्याच पदरांत घातली आहे. हे पत्र, आपण मरण पावल्यानंतर टपालांत टाकावें अशी त्याने व्यवस्था केली होती. ते पत्र महाराणीसाहेबांच्या हाती पडतांच त्यांस गहिंवर आला, व त्यांनी व त्यांच्या मातुश्रींनी त्या नेत्रहीन स्त्रियेस १०० पौड प्रतिवर्षास नेमणूक करून दिली. आणि ती केव्हां? तर सिंहासनावर बसण्याच्या आधीं ! ह्मणजे त्यांस त्या वेळी नेमणूक अगदीच थोडी होती. महाराणीसाहेबांनी इ. स. १८५७ सालचे बंड शमन झाल्यानंतर जेव्हां आमच्या हिंदुस्थानची ईस्टइंडिया कंपनीकडून राजसूत्रे हातांत घेतली, तेव्हां भरतखंडांतील प्रजेस आश्वासनाप्रीत्यर्थ त्यांनी एक मेहेरवानीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे मनांत आणून प्रधानास त्याचा मसुदा करण्यास सांगितले. तेव्हां मुख्य प्रधानजींनी आपल्या मताप्रमाणे त्या जाहीरनाम्याचा-मसुदा तयार करून आणला. त्यांत असें झटले होते की "हिंदुस्थानांतील प्रजेच्या रीतीभातीत किंवा धर्मात फेरफार करण्याचा राणीसरकारास अधिकार आहे." हे वाक्य पाहून व त्या जाहिरनाम्यांतील मतलब लक्ष्यांत आणून राणीसाहेब नाखुष झाल्या. आणि ह्मणाल्या "छे! छे! हे सारें हेतविरुद्ध आणि न्यायविरुद्ध झाले. धर्माच्या बाबतींत व रीतीभातींत हात घालण्याचा मला मुळींच अधिकार नाही. असे भलतेच लिहिल्याने माझ्या प्रजाजनांची मनें अधिक कलुषित मात्र होतील. ह्याकरिता असे लिहूं नका. ज्यांत दया, सौजन्य, व क्षमा ओतप्रोत भरलेली दिसून येईल, असा गोडसा जाहीरनामा लिहून आणा." ही आज्ञा होतांच, तो पहिला मसुदा रद्द होऊन हल्ली प्रसिद्ध असलेल्या जाहीरनाम्याचा मसुदा तयार होऊन त्यांच्यापुढे सही शिक्याकरता आला. तो त्यांनी वाचून पाहिल्यावर त्यांस फार संतोष झाला. आता त्या जाहीर. नाम्याप्रमाणे त्यांच्या अधिकारीवर्गाकडून अभिवचने पाळली गेली नसतील, किंवा हल्लींच्या लॉर्ड कर्झनसारख्या व्हाइसरायांनी म्हटल्याप्रमाणे ती " अशक्य सनद” ही झाली अ