या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १९०१. सेल, तर ती गोष्ट निराळी. पण त्याच्यावरून महाराणीसाहेबांच्या अंतःकरणाची समता, कोमलता, न्यायबुद्धि व दयाशीलता स्पष्ट दिसून येते, यांत तिळमात्र संशय नाही. हा नसुदा महाराणीसाहेबांस मानवला. तरी सुद्धा त्यांनी त्यांत " रयतेच्या कल्याणाविषयी सर्व शक्तिमान् परमेश्वर सामर्थ्य देवो" अशी स्वदस्तूरची अक्षरें सामील करून नंतर त्यावर सही केली. किती उदार, किती दयाशील व किती थोर मनाची माउली ! प्लेग, दुष्काळ, ह्यांसारखी आमची संकटे पाहून त्यांचा जीव तिळतिळ तुटे; व तच्छमनार्थ योग्य वाटतील त्या तजविजीही करीत. सत्तावनसालच्या बंडांत जो भयंकर रक्तपात झाला, त्यामुळे महाराणीसाहेबांचे अंतःकरण किती द्रवले हे त्या पहिल्या जाहीरनाम्यांतील शब्दांवरूनच दिसून येते. व त्यांत वंडांत सामील असलेल्या लोकांना जी करुणयुक्त अभिवचने दिलेली आहेत, त्यांवरून त्यांची दयाशीलताही उघड उघड दृष्टिगोचर होते. येवढंच नव्हे तर, ती दया फाजील झाल्याबद्दल त्यांनीच प्रथम नेमलेले गव्हरनरजनरल क्यानिंग साहेब यांस सुद्धा वाटलें. फार तर काय, पण राणीसाहेबांच्या तैनातीस असलेल्या चाकरनोकरांवर सुद्धा त्यांचे प्रेम इतकें विलक्षण होते की, त्यावरून त्यांचे अंतःकरण परमेश्वराने जणूं काय पुष्पाचेंच बनविले आहे असे वाटे ! एकदा त्यांच्या तैनातीस असलेला एक नोकर मरण पावला असता, त्याच्या वारसास त्यांनी दुखवट्याचे एक पत्र लिहिले होते. त्यांत त्या ह्मणतात " विश्वासू नोकर मृत्यु पावणे ह्मणजे आपला एक मित्र मृत्यु पावल्याप्रमाणे आहे. त्याची जागा कधीही भरून येणारी नव्हे, असें सम जणायांपैकी मी एक आहे." स्वामिभक्तीची उदाहरणे अनेक सांपडतील, पण सेवकभ। तीच असे मासलेवाईक व अप्रतिम उदाहरण फारच कचित आढळेल. दुसऱ्या एका वळा त्यांची एक तरुण दासी, आपल्या लग्नाचा निश्चय करून नोकरीचा राजीनामा देऊन निघाली. ती अशीच विश्वासू होती. तेव्हां तिला निरोप देतांना महाराणीसाहेबांसही पाईट वाटले. त्यांनी जातांना तिच्या हातांत एक सोन्याची बांगडी घातली, आणि तीस स्वहस्तं कुलूप घालून किल्ली आपणाजवळ ठेवली. आणि ह्मणाल्या " आतां तूं संसार करावयास जात आहेस, याकरितां ह्या हातांतील बांगडीकडे जेव्हा जेव्हां तूं पहाशील तेव्हां तेव्हां तूं माझें स्मरण करीत जा. आणि जिच्या पाशी माझ्या बांगडीची किल्ली आहे, या धननीच्या सेवेतच मी अद्याप आहे असे समज. हे माझें प्रेमाचे बंधन आहे." दुसऱ्या एके वेळी त्यांस बाहेर जावयाचे असतां, त्या कामावर नेमलेल्या दासीला येण्यास थोडासा उशीर झाला. तेव्हां ती आपल्या मनांत फार खजिल होऊन येतांच राणीसाहेबांस ह्मणाली “ राणीसाहेब ! मजकरितां आज आपणांस वाट पहावी लागली.” राणीसाहेब ह्मणाल्या "होय. चांगली दहा मिनिटे वाट पहावी लागली." हे ऐकतांच त्या दासीच्या आंगांत भयाने कांपरें भरले. राणीसाहेबांचा पोषाख चालला होता, व त्यांचा पदर नीट बांधावयाचा होता. व तो ती दासी बांधीत होती. इतक्यांत तिचे हात कापू लागल्याचे राणीसाहेबांच्या लक्ष्यांत, आले; व आपण थोडेसें कडक बोललों असे वाटून त्या तीस पुन्हा ह्मणाल्या "बरें; कांही हरकत नाही. आपण सर्वजणी ह्यापुढे आपआपला