या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. कामें वेळच्या वेळी करावयाला शिकू." किती कोमल मन हे ? इतकें ज्या माउलीचे मन कोमल, तिच्यापुढे जर देहांत शिक्षा देण्याच्या प्रसंग आला, तर तो कसा पार पडावा ? अर्थात् पडणे कठीण. तीच गोष्ट एकदां घडूनही आली. महाराणीसाहेब गादीवर बसल्या, नंतर लौकरच एका शिपायाला देहांताची शिक्षा कोर्टात ठरून तो कागद सही करण्याकरितां महाराणीसाहेब यांजकडे आला. त्या वेळी देहांताच्या शिक्षेवर राणीसाहेबांची सही लागत असे. प्रधानांनी तो कागद पुढे ठेवतांच राणीसाहेबांनी तो वाचून पाहिला, आणि त्यांस विचारले " ह्या मनुष्याच्या तर्फेनें कांहींच बोलतां येण्यासारखें नाहीं काय ?" प्रधानांनी हात जोडून उत्तर दिले " कांहीं नाहीं सरकार ! हा शिपायी चार वेळ सैन्यांतन पळून गेलेला आहे." राणीसाहेब पुन्हा ह्मणाल्या " काय ह्मणतां हो ? त्याच्यामध्ये चांगुलपणा कसला तो नव्हताच काय ?" प्रधान ह्मणाले " कांही दिसत नाहीं सरकार." राणीसाहेब पुन्हा ह्मणाल्या " असें कसें ह्मणतां ? पुन्हा विचार करून पहा." प्रधान थोडा विचार करून ह्मणाले " इतकें मात्र ह्मणतात की, तो शिपाईगिरीस जरी योग्य नव्हता, तरी त्याचे एरवींचे वर्तन चांगले होते.” राणीसाहेब प्रसन्न मुद्रेनें ह्मणाल्या “ बस्स. इतके आहेना ? पुरे तर.” असें ह्मणून त्यांनी त्याच्या खाली " गुन्हा माफ” अशी अक्षरे लिहून सही केली ! परंतु पुढे असले काम राणीसरकारांपर्यंत नेणे प्रशस्त नाही, असे पार्लमेंटने ठरवून त्यावर निराळ्याच कामदाराची नेमणूक केली. त्यांच्या पाठीमागे इतका उद्योग असे तरी, आलेल्या प्रधानास भेटणे, राजेरजवाड्यांच्या मुलाकती घेणे, इत्यादि कामेंही त्या वेळच्या वेळी करीत. हिंदुस्थानांतील राजेरजवाडेचसे काय, पण कोणीही मनुष्य भेटीस गेला तरी त्याची त्या भेट घेऊन त्याच्याशी प्रेमानें वोलत. प्रसिद्ध भगवद्भक्त बाबू केशव चंद्रसेन हे विलायतेस गेले होते तेव्हां, राणीसाहेबांनी परमादराने त्यांची भेट घेतली, येवढंच नव्हे तर, त्यांनी त्यांस आपल्या पंक्तीस भोजनास बोलावले होते. हा मान केवढा मोठा आहे, हे सांगणे नकोच. त्यांना हिंदुस्थानांतील कारागिरांची फार आवड असे. त्यांनी आपल्या राजवाड्यांत एक 'हिंदुस्थानी' या नांवाचा महाल बांधला आहे. तो सर्व हिंदुस्थानी कारागिरांकडून हिंदुस्थानी धर्तीवर बांधून त्यांत हिंदुस्थानांतीलच सर्व कारागिरीचे पदार्थ ठेवले आहेत. त्यांनी आपल्या तैनातीला मुद्दाम कितीएक हिंदुस्थानी नोकरही ठेवलेले होते. परदेशचे पाहुणे बहुतकरून त्यांच्या पंक्तीला कोणीना कोणी असतच; त्यांस वेळच्या वेळी आमंत्रण देण्याला, व ते भोजनास बसले असता, त्यांना त्यांच्या देशांतील रीतीभातींची वगैरे माहिती विचारण्याला त्या कधीही आळस करीत नसत. हिंदुस्थानांतील प्रजेवरही त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांच्या मुलाबाळांपैकी जी जी कोणी निवर्तली, त्यांबद्दल हिंदुस्थानांतून त्यांस अनेक दुखवट्याची पत्रे जात. त्यांची उत्तरे त्या स्वतः लिहून ती हिंदुस्थानांतील प्रसिद्ध वर्तमानपत्रांकडे व मासिक पुस्तकांकडे प्रसिद्ध होण्याकरितां अगत्यपूर्वक पाठवीत. असें एक त्यांचे स्वदस्तूरचे पत्र केरळकोकिळांत' प्रसिद्ध झालेले वाचकांनीही वाचलेलें आहेच. अशा सत्वशील राणी