या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १९०१. ४३ वरही दुष्टांनी गोळ्या घालण्याचा प्रयत्न करावा, ही किती शोचनीय व नीच गोष्ट बरें? पण तो सुद्धां विधि झाला. पण अशा अवतारी ज्या व्यक्ति असतात, त्यांची पुण्याईच लोबेत्तर असते. ह्मणून दुष्ट लोकांचे प्रयत्न त्यांच्या पुढे वायफळच होतात. अशी उदाहलं इतिहासांत सुद्धा अनेक आहेत. तीच गोष्ट येथेही प्रत्ययास येऊन हेही प्रयत्न निष्फळ होऊन राणीसाहेब त्या सर्वांतून पार पडल्या ! असे त्यांचे चरित्र मोठे गोड व बोधप्रद आहे. त्यांतील काही थोड्या गोष्टी येथे सांगितल्या आहेत. ह्याशिवाय राजकीय बाबतीत तर पुष्कळच फेरफार झालेले सांगण्यासारखे आहेत. पण ते सांगण्याला येथे अवकाश नाही. असो. ह्या सर्वांचा विचार केला ह्मणजे महाराणीसाहेब ह्या एक साक्षात् देवीचा अवतार होत्या असें ह्मणावे लागते. श्रीमद्भगवद्गीदेत सांगितलेच आहे की: यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा। तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम् ॥१॥ - अध्याय १० श्लो० ४१ जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया। ते ते जाण धनंजया । अंश माझे ॥ ७॥ ज्ञानेश्वरी. | असे सर्व दैविक गुण ह्या भाग्यशालिनी चक्रवर्तिनी महाराणीसाहेबांमध्ये एकवटले होते; व तिच्या पुण्याच्या बळावर, तिच्या जिवावर, तिच्या सत्तेखाली, कृपाछत्राच्या सावलीमध्ये आजवर आह्मी सुखांत नांदलों. तेव्हा तिच्या अखंड वियोगानें जिकडे तिकडे हाहाकार माजावा, आमचा उत्साहभंग व्हावा; आह्मांला उदासीनता प्राप्त व्हावी; आमच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहाव्यात हे साहजिकच आहे. तथापि त्या वयोवृद्ध झाल्या होत्या; त्यांनी आपले कर्तव्य उत्कृष्ट रीतीने बजावले होते; त्यांनी प्रजेची कळकळ बाळगली; परोपकार करून पुण्य जोडले; आणि आपल्या जन्माची सार्थकता केली. तेव्हां इहलोकाप्रमाणे परलोकांतही परमेश्वर त्यांस अत्युच्च स्थान देईल, असा भरंवसा धरून त्यांच्या गोड चरित्राने व मनोरम गुणानुवादाने आपल्या दुःखित मनाचे शांतवन करतो. व त्यांच्या सत्कीर्तिपरिमळाने युक्त असा 'पोतकां'नी गुंफलेला शेवटचा पद्यपुष्पहार परम पूज्यभक्तीने त्यांस अर्पण करितो:--