या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. चक्रवर्तिनी महाराणी व्हिक्टोरिया यांचा परलोकवास. श्लोक. जातां ग्रीष्म नभी अनेक उठती अभ्रे क्षणाभीतरी गेलें एक न तो प्रचंड दुसरें चालून येतें शिरीं । तैशी जाय घुमोनि काय पहिली जो दु:खवार्ता अजी हा हा हा ! तंव पातली अवचितां, मध्येच कैशी दुजी ॥१॥ भरुनि कनककुंभी ठेविलें गोरसातें । अवचित विषविंदु मिश्र होतां तशांतें। फुकट सकट जातें अंश थोडा पडून । विपरित गति तैशी आज आली घडून ॥ २ ॥ अवचित पडलें की मस्तकी वज्र घोर । मृदुल हृदयपद्मां झोंबला सर्प थोर ।। पडत कडकडोनी काय विद्युल्लता ही। अहह ! अजि दिशा ह्या जाहल्या शून्य दाही॥३॥ थरथर धरणीचे कांपतें काय अंग । दडपुनि जडभारें होय जाणों दुभंग । गगन चहुंकडोनि फाटलें आज वाटे । घनतिमिर जमोनी घोर कल्लोळ दाटे ॥ ४ ॥ खवळुनि जलधीच्या काय लाटा प्रचंड । धडकुनि गगनाला होतसे खंडखंड । धडडड पडला हा वाटतें शैलराज । नगर भरसुखाचें जाहलें दग्ध आज ॥ ५॥ तुटुनि पडत उल्का मेघनादेंकरून । हरहर सुरवल्ली काळ नेई हरून।। रुचिरतर बुडालें रत्न आजी जळांत । प्रतिकुल विधि तैसें सर्व होते पळांत ॥ ६ ॥ 'सुख सुख' सकलांना वाटते फार गोड़ । नविन नविन चाले नित्य त्याचीच तोड । परि वरि झडपाया काळ बैसे टपून । खलमति अति ऐसा अन्य लोकी रिपू न ॥ ७ ॥ घड न मिळत पोटा शुद्ध ऐसा भिकारी । झुलति गजतुरंगें ज्यांचिया नित्य दारी । श्रम करुनि सुखानें स्वस्थ जे कां रहाती। सरसकट यमाच्या लागती सर्व हाती ॥८॥ तिळभरि न ह्मणे हा चक्रवर्ती नृपाळ । सुर नरवर साधू थोर दाता कृपाळ । हरिहर अवतारी धर्म ना कर्मकर्ता । झडपुनि सकलां ने दुष्ट हा प्राणहतो ॥९॥ कवण समयिं कोणां केंवि कोठून साचा । झडपिल यम नाही नेम कांहींच त्याचा । अवचित कवणाला पाश घाली तुटून । तिळभरि न जिवांना शक्ति जाया सुटून ॥१०॥ निजभुजबलशाली कोण याहून मोठा । खल छलक मतीने फार हो फार खोटा। प्रखरतर दुजाचा काय आहे प्रभाव । तिळभरि तरि लागे काय येथें निभाव ॥ ११ ॥ राज्ञीची मृत्युवार्ता अहह अवचितां आज ऐकोनि कानें वाटे केला प्रहार प्रखरतर हृदी हाय कालांतकानें । सौख्याचे पाश वाटे तटतट तुटले सर्व होवोनि जीर्ण दुःखावेशे प्रजांचें हरहर शतधा चित्त झाले विदीर्ण ॥ १२॥