या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १९०१. माते ! जाशी अह्मांतें त्यजुनि मन कसे आजि केलें कठीण राज्ञी ह्या आर्यभूतें तव चिरविरहें, होतसे फार शीण । काळाचा हाय कैसा अजि तुजवरती वाहिला दुष्ट हात हा हा हा हा! प्रजेच्या घळघळ नयनी चालले अश्रुपात ॥ १३ ॥ नेतां धेनु हरोनि घालुनि जशी व्या क्षणार्धे उडी दुःखें हंबरडे फुटोनि रडती वत्सें जशी बापुडीं। किंवा माय निघोनि जाय पुढती जैशी तिची लेकरें होती दीन कळाविहीन, करिती आक्रोश उच्च खरें ॥ १४ ॥ अहा ! देवी सेवी नय विनय जी मूर्तचि दया महाराणी वाणी मृदुल, गुणखाणी सहृदया। अशी माता जातां अहह ! अमुची काळसदनीं कशी लोकें शोके विकल दिसती सर्व वदनीं ॥ १५ ॥ माते ! आहे तुझें गे! अखिल जगभरी राज्यखंड प्रचंड वक्ते मंत्री यशाचे विबुध नरमणी ज्ञान वाहे अखंड । झालें सर्वा सुखाचें सदन अजि खुलें शांतिसाम्राज्य चाले हा हा हा हा ! परी हे उघड विधिवशे सर्वही व्यर्थ झालें ॥ १६ ॥ चाले न्याय भला कलाकुशलता उद्योग नानापरी मोठे पंडित राजकार्यपटुही शास्त्रज्ञ धन्वंतरी । होती जोडुनि हातही तुजपुढे ती पंचभूतें उभी राज्ञी सर्व असा तुझा जगभरी गर्जे यशोदुंदुभी ॥ १७ ॥ सत्तेचे तुज जाहलें प्रभुकृपें भांडार सारे खुलें भाग्याचे धनधान्यसंततिसुखें सर्वस्वही लाभलें । लाभे ईशकृपें प्रजाहि सुमती तूं तीस माता जशी सारे सोडुनियां कठोर हृदयें हा हाय जाशी कशी ॥ १८ ॥ काळाचे काळ ऐसे समरपट जिला वांकवीतात माना । मानाचे वैभवाचे, वचकुनि असती, भूपती जीस नाना। नाहीं पृथ्वींत कोणी, नृपति हिजसमा, की नसे दंडधर्ती राज्ञी व्हिक्टोरिया जी अखिल विजयिनी स्वामिनी चक्रवर्ती ॥ १९ ॥ गेली गेली रुचिर अमुची साउली हाय गेली भाग्याची ही सुभग पुतळी अंतकें आज नेली। भूलोकींची अहह ! तुटली तारका दिव्य आजी दुःखावेशें, कवनरथि खुंटले शब्दवाजी ॥ २० ॥