या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९८. किंवा महदाकाश होय. योग्याला जेव्हां दुसऱ्या व्यक्तीचे अंतर्गत विचार कळू लागतात, किंवा दिव्य-अगम्य-पदार्थ जेव्हां तो पाहूं लागतो, तेव्हां ते त्याला दुसऱ्याच एका पोकळीत दिसतात. त्या पोकळीला 'चित्ताकाश' किंवा मानसिकस्थान असें ह्मणतात. ज्ञान जेथे ज्ञेयरहित होते; चैतन्य जेथें निर्हेतुक होते; आणि आत्मा जेथें स्वयंदीतीने झळकू लागतो, त्याला 'चिदाकाश' किंवा ज्ञानस्थान असें ह्मणतात. कुंडलिनी जागृत होऊन जेव्हां सुषुम्नेत प्रवेश करते, तेव्हां सर्व ज्ञान चित्ताकाशामध्ये असते. आणि ती जेव्हां मेंदूंत असलेल्या आपल्या शेवटाच्या तोंडाला जाऊन पोंचते, तेव्हां निर्विषयज्ञान चिदाकाशामध्ये असते. तारायंत्राच्या सादृश्यावरून आपणास असे वाटतें की, तार असेल तेथपर्यंतच प्रवाह पाठविता येईल. परंतु सृष्टविद्युत्ला आपला प्रचंड प्रवाह पाठविण्याला तारांची मुळींच जरूर नाही. ह्यावरून असा सिद्धांत निघतो की, खरोखर तारांचीही काही गरज नाही. परंतु तारेशिवाय प्रवाह चालूच करता येणार नाही, हा जो आमचा कमकुवतपणा, तोच आझांस तारेचा उपयोग करणे भाग पाडतो. जोर अशाच रीतीने ह्या ज्ञानतंतूंच्या द्वारे सर्व शारीरिक ज्ञान आणि गति देणारे पृष्ठरज्जूतील ज्ञानतंतूंचे जे दोर त्याच योग्याच्या इडा व पिंगळा होत. ह्या दोन मोठ्या नळांतून उत्सारक आणि अभिसारक प्रवाह खेळत असतात. पण मनाने ज्ञानतंतूंशिवायच कां बातमी पाठवू नये? किंवा कोणत्याही तंतूंवाचून किंवा तारांवांचूनच ती कां घेऊं नये ? सृष्टीला ही गोष्ट शक्य आहे हे आपणांस माहितच आहे. योगी ह्मणतो हे जर तुह्मांला करतां आले, तर तुझी मायाबंधांतून मुक्त झालांच. तर मग ते करावें कसें ? पाठीच्या कण्याच्या मध्यावर असलेली पोकळ नळी जी सुषुम्ना, तींतून ज्ञानरसाचा प्रवाह जर तुह्मांला खेळवितां आला, तर तुझांला हे गूढ सुटले. हे ज्ञानतंतूंचे जाळे जर मनानेच विणलेले आहे, तर ते त्यानेच तोडले पाहिजे. ह्मणजे ज्ञान

  • 'केरळकोकिळ' पुस्तक ३ अं० १० पान २३० ह्यामध्ये 'गोगलगायीचे तारायंत्र' ह्यासंबंधानें अपूर्व माहिती दिली आहे. ती अवश्य पहावी. ह्मणजे तारेच्या साह्यावांचूनच केवळ तादात्म्यशक्तीने बातमी पाठविता येते, ही गोष्ट समजून येईल.

-ए० के० को०