या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १९०१. खाग्नीने होरपळलेल्या अंतःकरणास दुसरीकडून शीतल वायने सुखित करावे, किंवा एका त्रांतून दुःखाश्रू वाहतात तोच दुसऱ्या नेत्रांतून आनंदाश्रृंचा पाझर फुटावा, त्याप्रमाणे सुखदुःखमिश्रणाची संधि ह्या जगामध्ये क्वचित् प्रसंगी येत असते. व ती बहुतकरून ए. मागून एक राजा पदारूढ होतांना येते. त्याप्रमाणे आज आली आहे. आमच्या दयाळू चक्रवर्तिनी महाराणीसाहेब, ह्यांच्या पश्चात् त्यांचे वडील चिरंजीव-ज्यांचे पूर्वीचें नांव त्रिन्स ऑफ वेल्स असें होतें-ते ता० २३ जानेवारी सन १९०१ इसवीपासून 'सातवे एडवर्ड महाराज' ह्या नांवानें इंग्लंडचे राजे व हिंदुस्थानचे बादशाहा झाले आहेत. ह्यांचे व्य आजमितीस ६० वर्षांचे असल्याने ते पोत व अनुभवी आहेत. त्यांस पट्टाभिषेक झाला, तेव्हां त्यांनी तेथे येणेप्रमाणे भाषण केलें: " राजेसाहेब, सरदार व सभ्य गृहस्थहो ! तुह्मांपुढे बोलण्याचा आज जो प्रसंग आहे तो अत्यंत दुःखकारक आहे. माझ्या प्रियकर मातोश्री राणीसाहेब यांचा मृत्यु आपणास निवेदन करणे हे माझे पहिले व दुःखात्मक कर्तव्य आहे, आणि आह्मां सर्वांचें हें जें अपरिहार्य नुकसान झालेले आहे त्यामुळे तुह्मी,-सर्व राष्ट्र-अथवा माझ्या मते सर्व जग मटले तरी चालेल,-मजकरितां किती हळहळत आहां हे मला माहीत आहे. माझ्या आंगावर जी मोठी जबाबदारी आतां येऊन पडली आहे, ती पुरी करण्याच्या कामी मी नेहमी राणी-साहेबांच्याच मार्गाचे अवलंबन करण्याचा प्रयत्न करीन, हे मी सांगितले पाहिजे असे नाही. खरोखरच कायद्याने नियंत्रित अशा प्रकारचाच राजा होण्याचा आणि माझ्या शरीरांत जीव आहे तोपर्यंत माझ्या प्रजेच्या कल्याणाकरितां झटण्याचा मी पूर्ण निश्चय केलेला आहे. माझ्या पूर्वीच्या गादीवरील सहा पुरुषांस में नांव होते, तेच एडवर्ड हे नांव धारण करण्याचा मी संकल्प केला आहे. असे केल्याने माझ्या चिर संस्मरणीय, थोर आणि बहाण्या वडिलांची-ऑलबर्ट या नांवाची-आणि सर्वानुमते ज्यांस चांगले ऑलबर्ट असें यथार्थ नामाभिधान माझ्या मते मिळालेले होते त्यांच्या नावाची-योग्यता मी कमी समजतों असे नाही. तर ते नांव तसेंच अनन्यगामी व्हावे अशी माझी इच्छा आहे. सरते शेवटी वारसाच्या हक्काने माझ्यावर जी अति मोठी जबाबदारी आलेली आहे आणि ज्या कामी यी आपल्या आयुष्यभर माझें सर्वस्व खर्च करण्याचा निश्चय केला आहे, तें सिद्धीस नेप्यास सर्व राष्ट्राची व पार्लमेंटाची मला मदत मिळेल असा मला भरंवसा आहे." नवीन बादशाहा यांचे या प्रकारचे झालेले भाषण, आणि लॉर्ड लोकांचा जाहीरनामा, हिंदुस्थानांत मुंबई, मद्रास व कलकत्ता या तिन्ही ठिकाणी वाचण्यांत आला व सर्वत्र यांच्या नांवानें त्रिवार जयघोष होऊन इंग्लंडचे राजे व हिंदुस्थानचे बादशाहा सातवे एडवर्ड यांचे राज्यास ता० २३ पासूनच सुरवात झाली आहे. त्यानंतर हिंदुस्थानसरकारानें स्टेट सेक्रेटरीत विलायतेंत हिंदुस्थानचे बादशाहा सातवे एडवर्ड यांस निरोप कळविण्याकरितां ता पाठविला तो असाः-" महाराणीसाहेबांच्या मृत्यूचें वर्तमान ऐकून हिंदुस्थानसरकारास अत्यंत दुःख वाटते. हिंदुस्थानच्या सर्व