या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. भागांतून व सर्व जातींच्या आणि धर्माच्या लोकांकडून त्यांस अत्यंत दुःख व शोक झाल्याबद्दलचे निरोप येत आहेत. हिंदुस्थानसरकार, राजेरजवाडे आणि लोक मिळून सवीस आजपर्यंत झालेल्या राजांमध्ये अतिशय सन्मान्य आणि ज्याबद्दल लोकांची राजनिष्ठा व भक्ति ही दोन्ही एकवटलेली होती असा राजा गेल्याबद्दल सारखेच दुःख होत आहे. हिंदुस्थानची राणीच नव्हे, तर मातोश्री गेली असे सर्वांस वाटत आहे. सर्वांच्या वतीने वादशाहास हा निरोप आपण कळवावा व ते राज्यारूढ झाले ह्मणून त्यांस आमचा नम्र प्रणाम पोंहोंचवावा अशी आपणास विनंति आहे." हिंदुस्थानसरकाराने पाठविलेल्या या निरोपास बादशाहा सातवे एडवर्ड यांनी पुढील उत्तर तारेने पाठविले असून ते हिंदुस्थानातील राजेरजवाडे व लोक यांस कळविण्यास लिहिले आहे. तें येणेप्रमाणे:-"आपणाकडून आलेल्या निरोपावरून सार्वभौम महाराणी व्हिक्टोरिया यांनी आपल्या न्यायी व शहाणपणाच्या दीर्घ कारकीर्दीमुळे आणि प्रजाजनांच्या कल्याणाबद्दल त्यांच्या मनांत जी कळकळ वसत असे त्यामुळे, लोकांचे जे प्रेम व राजनिष्ठा संपादन केलेली दिसून येते ती आह्मी जाणतों; आणि राणीसाहेबांच्या मृत्यूमुळे सर्व लोकांस झालेले दुःख कळविण्याकरिता त्यांनी जो निरोप धाडला आहे तो ऐकून आमांसही अत्यंत गहिंवर येतो. आमी गादीवर आल्यामुळे आमांस राजनिष्ठापूर्वक जे प्रणाम कळविले आहेत त्यांचाही आमी स्वीकार करतों असें हिंदुस्थानांतील राजेरजवाडे व लोक यांस आपण कळवावें. हिंदुस्थान देश आह्मीं पाहिलेला आहे; व तेथील लोकांची आमच्या गादीबद्दलची भक्ति चांगला आहे असा आह्मांस पूर्ण भरंवसा असून त्यांचा उत्कर्ष व कल्याण जेणेकरून होईल तच आला आपले पहिले काम व कर्तव्य समजूं." हे आमचे प्रस्तुतचे बादशाहा इ. स. १८७५ मध्ये हिंदुस्थानांत आले होते. त्याना यथाल ग्रजेची स्थिति प्रत्यक्ष पाहिली आहे. ते पोक्त व अनुभविक आहेत; त्यांचे शिक्षण त्याच्या मातोश्रींच्याच देखरेखीखाली झालेले आहे. ते सदासर्वदा प्रजेच्या कल्याणात दक्ष राक्ष तील असा भरंवसा वाटतो. व त्या कामी त्यांस सर्वांतरात्मा परमेश्वर सहाय करा, अशा प्रार्थना करून ह्या आमच्या नव्या सातव्या एडवर्ड वादशाहाच्या नांवानें आझीही त्रिवार जयजयकार करतो. श्लोक. देवो ईश तुह्मांस सद्यश विभो दीर्घायुरारोग्यता त्वन्मातेहुलिही विशेष तुमची वाढो जगीं योग्यता । गर्जावा नृपते प्रताप तुमचा पृथ्वीवरी आगळा देवोनी विलसो सदा परिमळा सत्कीर्तिमाळा गळा ॥१॥ PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYASAGARA" PRESS, Bombay.