या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. [अं०३ मंगुताईवर मोहीम ! Homewomen | अज्ञान हे एक अद्भुत व मनोरंजक देखाव्याचे भांडार आहे. त्याच्या बीलेमध्ये जे नानाविध चमत्कार दृष्टीस पडतात, ते पाहून मन कधीकधी कौतुकसागरांत हेलकावे खात रहाते. किंबहुना अज्ञानांत दृष्टीस पडणारी मौज इतरत्र कोठेच दृष्टीस पडत नाहीं मटले तरी चालेल. गसिफिक महासागरांतील कित्येक बेटांमध्ये युरोपियन लोकांनी पाऊल टिवण्यापूर्वी तेथील लोकांस जनावरें ह्मणून काय ती ससे व डुकरें मात्र माहीत होती. अशा बेटांपैकी एका बेटावर खलाशांनी एक जहाज लावले. व थोडा वेळ वरवा करून, जेवणखाण करावयाचें तें करून,