या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. पाणी भरावयाचे होते ते भरून ते जहाज हाकारून निघाले. पण ये. वढ्या गडबडीत त्या जहाजावर एक मांजर बाळगलेलें होतें तें खाली जमिनीवरच राहिले. व आश्रयाकरितां हिकडे तिकडे भटकत फिरूं लागले. ते त्या बेटांत त्या रानटी लोकांचें एक देवालय होते, त्यांत गेले, आणि जेथें देवाची मूर्ति होती त्या गाभाऱ्यांत जाऊन बसले. थोडे दिवस गेल्यानंतर एके दिवशी त्या देवाचा पुजारी कांहीं पूजासाहित्य व थोडेसे लोक बरोबर घेऊन देवाच्या पूजेसाठी त्या देवालयांत आला, आणि रीतीप्रमाणे देवालयाचे दार उघडले. तो त्या मांजरानें “म्याँव, म्याँव" असा शब्द केला ! पुजारीबोवांनी मांजराचा शब्द कधी जन्मांत ऐकलेला नव्हता. तेव्हां त्यांस तो किती भयंकर वाटला असेल, हे सांगणे नकोच ! पुजारीबुवांची भयाने बोबडीच वळली. ते धूम ओरडत सुटले, आणि मंडळीला घाबय घाबय सांगू लागले "अहो ! समुद्रांतून राक्षस आला ! अहो ! समुद्रांतून राक्षस आला! आणि देवळांत शिरून बसला आहे !" मग काय विचारावें! साऱ्या गांवांत । एकच हूल पडली. सारी मंडळी धांवत धांवत आपआपल्या घरीं । गेली. सर्वांनी आपले लढाईचे पोषाख घातले. हातांत भाले, बचो, ढाल, तरवारी घेऊन सज्ज होऊन शेकडों लोक देवालयापाशी जमा झाले. येवढ्या जंगी सैन्याची आपणावर आलेली धाड पाहून बिचाया एकच हाना आपले लढाईचाऊन शेकडों की धाड पाह काय करावे, आणि कोठे जावें, हेही सुचेना! ती घाबय घाबन्या त्या उघड्या असलेल्या द्वारांतून जी टनकर उडी मारून निघाली, ती त्या भेदरलेल्या शूर योद्ध्यांच्या तंगड्यांतून पार निघून गेली! मग काय विचारतां ? "राक्षस ! राक्षस !" ह्मणून एकच आरोळी ठोकून सारे सैन्य परतें दाही दिशांला पळत सुटले! ह्या चिमुकल्या राक्षसाच्या भयान त्या रणबहादरांची फारच दुर्दशा उडाली. साऱ्यांच्या हातापायांत कांपरे भरले; हातांतील तरवारी गळून पडल्या: पायांत पाय अडखळू लागले; तोंडाची बोबडी वळली; भयाने छाती धडधडू लागली. ह्याप्रमाणे ह्या आमच्या मंगुताईंनी ह्या पहिल्या वेळी तर येवढ्या रणधुरंधर सैन्याची दाणादाण करून सोडली. अशा प्रकारे ते मांजर फिरून रानांत गेल्यावर ते सारे अडाणी मनुष्य