या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१. १ पुन्हा एकत्र होऊन विचार करू लागले. कोणी ह्मणत राक्षस मोठा प्रचंड आणि मायावी आहे ! तो मरणे कठीण ! ह्याप्रमाणे चिंताक्रांत होऊन आपआपल्यापरी कालक्रमणा करूं लागले. तथापि हा विलक्षण राक्षस हे आपल्या गांवावर एक विघ्न आले आहे असे समजून सर्व गांवकरी दररोज सायंकाळी देवापुढे गाणे, नाच वगैरे करीत बसत. एके दिवशी नित्याप्रमाणे हे शूर योद्धे देवालयामध्ये गाणे बजावणे करून रमत बसले होते, व नाचणारी मंडळी सभोंवार फेर धरून नाचत होती. इतक्यांत ह्या आमच्या मंगुताईही चुकल्या चुकल्यासारख्या फिरत फिरत तेथे येऊन पोचल्या. व हा ह्यांचा नाच, तमाशा पाहून त्यांनाही एक प्रकारची मौज वाटली. ह्यास्तव त्यांनींही मध्येच एक मुसंडी देऊन नाचणारांच्या पायांतून निघून गेल्या !! तेव्हां त्या साऱ्या ग्रामस्थांची जी तिरपिट झाली, ती सांगतां सोय नाही. त्यांनी एकच आरडा करून आकाशपाताळ अगदी दणाणून सोडले! पुन्हा आंगांत धीर धरून नवा दम आणला, आणि पुनरपि 'सायुध व सशक्तिक' होऊन त्या दुष्ट राक्षसावर चालून आले. पण हा राक्षस पडला चिमुकला. आमच्या मंगुताईंनी घाबय घाबय दोन तीनदां 'म्याँव, म्याँव' केले, आणि त्या परचक्राच्या वेढ्यांतून मुसंडी देऊन पार पडल्या! त्या भेकडांची पुन्हाही दाणादाण उडाली. ते धापा -टाकीत पळत सुटले. त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणीं तो राक्षसच दिसू लागला. अशा प्रकारे ह्या राक्षसाबद्दल त्या ज्ञानशून्य लोकांची कितीएक महिने धामधूम चालली होती. रात्रंदिवस कोणाला झोंप नाही अशी त्यांची स्थिति झाली. | सरतेशेवटी देवास त्या अज्ञ लोकांची करुणा आली. आमच्या मंगुताई एके दिवशीं बिचाऱ्या दोन प्रहरी झाडाच्या सावलीस निजून पडलेव्या त्या लोकांच्या दृष्टीस पडल्या. तेव्हां त्या तरवारबहादरांनी कोणत्याही प्रकारची चाहूल लागू न देतां, मुकाट्याने येऊन मोठ्या धीटपणाने त्याच्यावर तरवारीचे घावावर घाव घालून त्यास निजधामास पाठविलें, आणि रात्रंदिवस देवालयांत शिरण्यास सवकलेल्या प्रचंड राक्षसाचा पुरता बीमोड करून सोडला !!