या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१. स्त्रांत सांगितल्याप्रमाणे हीही गोष्ट खरी आहे की, मनुष्यांमध्ये त्यांतून बाहेर पडण्यासारखे काहीतरी आहे खरें. सर्व ज्ञान मनुष्यांमध्येच आहे. पण त्याला बाहेर बोलवावयाला काहीतरी साधन पाहिजे. गुरूशिवाय आमांस ज्ञानप्राप्ति होणे शक्य नाही. मनुष्य गुरु आहेत; देव गुरु आहेत; किंवा देवदूत गुरु आहेत; पण ते सारे मर्यादित आहेत. पण त्यांच्या पूर्वीचा गुरु कोण ? ह्मणून आमांला हे अखेर कबूल केलेच पाहिजे की, गुरु हा एक, की ज्याला कालाचे बंधन नाहीं, तो सर्वज्ञ गुरु एक, त्याला आदि नाहीं व अंत नाही. त्यालाच ईश्वर ह्मणतात.ार २७ त्याचे स्पष्ट नाम ॐ हैं होय. मामाजमा - आपल्या मनामध्ये जी कल्पना येते, तिचे प्रतिबिंब शब्दामध्ये उठत असतें.मा शब्द आणि विचार हे अगदी अभिन्न आहेत. विचाराच्या वाह्य भागांस आह्मी शब्द ह्मणतों, आणि अंतर्भागांस विचार असें ह्मणतों. विचारांस शब्दांपासून वेगळे करून त्यांचे पृथक्करण करतां येणें मनुष्यांस शक्य नाही. भाषा ही मनुष्यांनी उत्पन्न केली, किंवा कांहीं मनुष्य एकत्र बसून शब्दांचा निश्चय ठरविला, ही कल्पना चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे. गो शब्द आणि भाषा ही, वस्तुमात्र अस्तित्वात आल्यापासून आहेतच. शब्द आणि कल्पना ह्यांच्यामधील सांधा कोणता? विचाराबरोबर शब्द हा नेहमी पाहिजेच असे जरी आपणांस दृष्टीस पडते, तरी अमुक विचाराला अमुकच शब्द असण्याची काही आवश्यकता नाही. निरनिराळ्या वीस देशांमध्ये विचार एकच असू शकेल. पण भाषा भिन्न भिन्न असणार. प्रत्येक विचार प्रगट करण्याला आमाला शब्द पाहिजे. पण ह्या शब्दांना सारखा उच्चार असण्याची जरूरी नाही. उच्चार हे निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये निरनिराळे असतील. आमचा टीकाकार ह्मणतो “ विचार आणि शब्द ह्यांच्यामधील संबंध जरी निखालस स्वाभाविक आहे, तरी एक कल्पना आणि एक स्वर ह्यांच्यामधील संबंध कायमचा करण्याला काही साधनीभूत होत नाही." हे उचार बदलतात, पण विचारामधील आणि उच्चारामधील खाभाविक संबंध कांहीं बदलत नाही. प्रतिमा आणि वस्तुबोध ह्यांच्यामध्ये जर खरोखर संबंध असेल तरच विचार आणि शब्द ह्यांच्यामधील संबंध उत्तम असतो. आणि असा संबंध उत्पन्न होईपर्यंत ती प्रतिमा मात्र सर्वांच्या