या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१. मिक कल्पना ह्या एका 'ॐ' शब्दामध्ये एकत्र होतात. वेदांत वर्णिलेले -सर्व धार्मिकविचार, ह्या ॐ शब्दाभोंवतीं आपण होऊनच जमा होतात. इतकेच नव्हे, तर अमेरिका, इंग्लंद किंवा इतर देशाच्या संबंधाने तरी काय ? इतकेंच की, भरतखंडामध्ये तो शब्द, धर्मोन्नतीच्या प्रत्येक पायरीस लावलेला असतो, आणि हिकडे तो परमेश्वराविषयींच्याच सर्व कल्पनेकडे लावलेला आहे, इतकेंच. द्वैती, अद्वैती, द्वैताद्वैती, समष्टीमती, नव्हे-नास्तिक सुद्धां-ह्या ओम्चाच स्वीकार करतात. मानवी प्राण्यांच्या फार मोठ्या समाजानें 'ओम् ' ही एकच प्रतिमा ग्रहण केलेली आहे. उदाहरणार्थ, इंग्रजी शब्द 'गॉड' हाच घेऊ. ह्याची व्याप्ति अगदीच संकुचित आहे. त्याच्या पलीकडे आपणांस जाणे असेल तर, त्याचे विशेष्य करावयाला-त्याला प्रत्यक्षता आणावयाला-किंवा पूर्ण परमेश्वराचा बोध होईसें करावयाला-आपणांस आणखी विशेषणे जोडावी लागतात. परमेश्वराला जे इतर भाषेत शब्द आहेत, त्यांची गोष्टही अशीच. त्यांची व्याप्ति फारच संकुचित असते. पण ओम् ह्या शब्दाचे क्षेत्र अत्यंत विस्तृत आहे. इतकें की तो प्रत्येकाला मान्य झालाच पाहिजे. २.८ ह्याचा (ओमचा), जप आणि त्याच्या अर्थाचें ध्यान. (हा एक मार्ग आहे.) त्याचा जपच कशाला करावयाला पाहिजे ? संस्कारांतील कांहीं गुण किंवा ठसे मनामध्ये रहातात, ही उपपत्ति अद्याप आपल्या स्मरणांतून गेलेली नाही. सर्व ठसे मनामध्ये रहातात, आणि ते अधिकाधिक गुप्त स्थितींत-सूक्ष्म स्वरूपांत-असतात. आणि त्यांना यथायोग्य उत्तेजन मिळाले की, ते बाहेर पडतात. परमाणूंची हालचाल कधीच बंद पडत नाही. ह्या सर्व ब्रह्मांडाचा नाश होऊन जड लहरी सर्व बंद पडल्या, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, सारे धुळीस मिळाले तरी, परमाणूंमध्ये कंप-हालचाल-हा असतोच. प्रचंड गोल जशी कार्य करतात, त्याचप्रमाणे प्रत्येक परमाणूही कार्य करीत असतो. त्याचप्रमाणे चित्ताच्या लहरी स्थिरावल्या तरी, त्या परमाणूंच्या व्यापाराप्रमाणे हालत असतात. आणि त्यांना धक्का बसला की, त्या पुन्हा वर उचलतात. ह्यावरून जपाचा उद्देश काय हे आपल्यास समजून येईल. त्याच्या योगानें पारमार्थिक संस्काराला अ